Dan Rivera Death : प्रसिद्ध पॅरानॉर्मल संशोधकाचा गूढ मृत्यू; 'ॲनाबेल' या हॉन्टेड बाहुलीसोबत करत होते प्रवास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुन्हा एखदा ॲनाबेल डॉलची दहशत संपूर्ण जगभर परसली आहे. या रहस्यमयी भुताटकी बाहुलीमुळे एका प्रसिद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या पेंन्सिलव्हेनियात गेटिबर्ग शहरातून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. एखाद्या भयपटासारखी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हेस्टिगेटर डॅन रिवेरा यांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाला आहे. डॅन रविरा ॲनाबेल डॉलसोबत देशभर भटकंती करत होते. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॅन रिवेरा अमेरिकन आर्मीचे रिटार्यड जवान आहे. सध्या ते देशभर ॲनाबेल डॉल सोबत भटकंती करत होता. नुकतेच त्यांचा मृत्यू झाला असून पेन्सिलव्हेनियाच्या गेटिसबर्गमधील एका शो नंतर त्यांचा मतदेह संशयास्पद अवस्थेत सापडाला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, डॅन रिव्हेरा हॉटेलच्या खोलीत विश्रांती घेत होते. यावेळी अचानक खोलीतून जोराजोरात किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. यामुळे हॉटेलमधील सर्व लोक घाबरले होते. त्यानंतर काही वेळाने संपूर्ण हॉटेलमधील शांतता पसरली. एखादी सुई जरी पडली तर आवाज होईल असे वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर हॉटेल स्टाफने डॅन रिवेरा यांच्या रुमचा दरवाजा उघडला. यावेळी डॅन रिवेरा त्यांना बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने शुद्धीवर आणण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण सध्या अस्पष्ट आहे. सध्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. परंतु पोलिसांना प्राथमिक तपासांत काहीही संशयास्पद गोष्टी आढळल्या नाही. परंतु डॅन यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने अनाबेल डॉलची दहशत निर्माण झाली आहे.
यापूर्वी देखील १९७० च्या दशकात प्रसिद्ध पॅरानॉर्मल इनव्हिस्टिगेटर एड आणिलॉरेन वॉरेन यांनी या बाहुलीमध्या दैवी शक्ती असल्याचा दावा केला होता. त्यांनी ही भुताटकी बाहुलू कनेक्टिकट येथील म्युझियममध्ये ठेवली होती. या भुताटकी बाहुलीवर आधिरीत भयपट देखील तयार करण्यात आले आहे. The Conjuring आणि Annabelle या हॉरर सिनेमांची निर्मिती कण्यात आली आहे.
डॅन रिवेरा हे Most Haunted Places आणि 28 days Haunted सारख्या टिव्ही शोमध्ये देखील झळकले होते. स्या त्यांच्या मृत्यूची आणि त्यांच्यासोबत ॲनाबेल डॉल असताना घडलेल्या भयावह घटनांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अनाबेल डॉलमुळे जेलब्रेक आणि आग लागाल्याचा दावा लोकांनी केला आहे. परंतु तज्ञांनी या अफवा असल्याचे म्हटले आहे.