Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोखरणच्या रणांगणावर ‘रुद्र शक्ती’ गडगडाट; अपाचे हेलिकॉप्टरच्या घिरट्या, तोफा अन्…;

Pokhran News: वेग, अचूकता आणि संघभावनेच्या जोरावर गुंतागुंतीच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता उल्लेखनीय असल्याचे ले. जनरल सेठ नमूद केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 03:46 PM
पोखरणच्या रणांगणावर ‘रुद्र शक्ती’ गडगडाट; अपाचे हेलिकॉप्टरच्या घिरट्या,  तोफा अन्…;
Follow Us
Close
Follow Us:

दक्षिण कमांड प्रमुखांकडून युद्धसज्जतेचा आढावा
रुद्र ब्रिगेडतर्फे आयोजित करण्यात आला युद्ध सराव
लष्करी कारवाया करण्याची क्षमता तपासणे हा मुख्य उद्देश

पुणे: राजस्थानातील पोखरण फील्ड फायरिंग रेंजवर रणगाड्यांची गर्जना, तोफांचा दणदणाट आणि आकाशात घिरट्या घालणारी अपाचे हेलिकॉप्टर्स यांच्या साक्षीने पार पडलेल्या ‘एक्सरसाइज रुद्र शक्ती’मधून भारतीय लष्कराने आधुनिक रणांगणासाठीची आपली सज्जता पुन्हा अधोरेखित केली. दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी या युद्धाभ्यासाचा आढावा घेत सैनिकांच्या तयारीचे कौतुक केले.रुद्र ब्रिगेडतर्फे आयोजित हा सर्वांगिण (ऑल-आर्म्स) सराव प्रत्यक्ष गोळीबारासह पार पडला. बदलत्या युद्धपरिस्थितीत उच्च तीव्रतेच्या समन्वित लष्करी कारवाया करण्याची क्षमता तपासणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. यापूर्वी झालेल्या ‘एक्सरसाइज अखंड प्रहार’च्या पुढील टप्पा म्हणून ‘रुद्र शक्ती’ आयोजित करण्यात आली.

Pune News: ‘एकता शक्ती’ सरावाने भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

या सरावात यांत्रिक दल, तोफखाना, हवाई संरक्षण युनिट्स, आर्मी एव्हिएशनची एएलएच-डब्ल्यूएसआय आणि अपाचे हेलिकॉप्टर्स तसेच मानवरहित हवाई प्रणाली(यूएएस) व काउंटर-यूएएस तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. जमीन, आकाश आणि डिजिटल क्षेत्रांमधील अचूक समन्वयातून लष्कराने आपले युद्धकौशल्य प्रदर्शित केले.

आढाव्यादरम्यान ले. जनरल सेठ यांनी सैनिकांशी संवाद साधत त्यांच्या उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाचे, व्यावसायिकतेचे आणि ऑपरेशनल तत्परतेचे विशेष कौतुक केले. वेग, अचूकता आणि संघभावनेच्या जोरावर गुंतागुंतीच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘रुद्र शक्ती’ हा सराव भारतीय लष्करातील सुरू असलेल्या आधुनिकीकरणाचा ठोस पुरावा मानला जात असून नव्या रणनिती, तांत्रिक सक्षमीकरण आणि संघटनात्मक नवकल्पनांच्या आधारे भविष्यातील सुरक्षाआव्हानांना तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

भारताकडे वाकड्या नजरेने बघाल तर…! ‘या’ ठिकाणी पार पडले Army-CISF संयुक्त प्रशिक्षण

भारतीय सेना- CISF संयुक्त प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप

दक्षिण कमांडतर्फे औंध मिलिटरी स्टेशन येथील मिलिटरी-सिव्हिल फ्युजन नोडमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफ जवानांसाठी आयोजित दोन आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षण कॅप्सूलचा ३१ जानेवारी रोजी यशस्वी समारोप झाला. या प्रशिक्षणाचा समारोप ‘एकता शक्ती’ या व्हॅलिडेशन सरावाने करण्यात आला. या प्रशिक्षणाचा उद्देश जटिल आणि बदलत्या सुरक्षा परिस्थितींमध्ये प्रथम प्रतिसाद देणाऱ्या सीआयएसएफ कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि सज्जता वाढवणे हा होता. प्रशिक्षणामध्ये क्विक रिएक्शन टीम ड्रिल्स, मूलभूत फील्ड व बॅटल क्राफ्ट, फायरिंग तसेच मार्शल आर्ट्स यांचा समावेश होता, ज्यामुळे सहभागी जवानांना आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्याचे कौशल्य विकसित झाले.

Web Title: Rudra shakti exercise apache helicopters pokhran rajasthan indian army marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Indian Armed Forces
  • indian army
  • rajasthan

संबंधित बातम्या

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’
1

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’

Galwan Conflicts: लष्कराचे दोन वास्तव… दोन्ही परस्परविरोधी; गलवानचे सत्य?
2

Galwan Conflicts: लष्कराचे दोन वास्तव… दोन्ही परस्परविरोधी; गलवानचे सत्य?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.