intranasel vaccine
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत बायोटेक कंपनीने कोरोनाच्या BBV-154 इंट्रानेजल लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी (Corona Vaccine Trials) पूर्ण झाली आहे. ही लस नाकावाटे (Intranasal Vaccine) देण्यात येणार आहे. ही लस बुस्टर डोस म्हणून दिली जाऊ शकते.
[read_also content=”‘सालार’ च्या पोस्टरमध्ये प्रभासचा वेगळा लूक, चाहत्यांची वाढली उत्सुकता https://www.navarashtra.com/movies/salaar-movie-poster-release-prabhas-seen-in-cruel-look-nrsr-316444.html”]
BBV-154 इंट्रानेजल लशीची पहिली आणि तिसरी चाचणी पूर्ण करण्यात आली होती. चाचणीच्या काळात ही लस पहिला आणि दुसरा डोस म्हणून देण्यात आली होती. नंतर बुस्टर डोस म्हणूनदेखील या लशीची चाचणी करण्यात आली. बुस्टर डोस म्हणून चाचणी करताना ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा व्यक्तींवर चाचणी करण्यात आली.
तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीतील आकडेवारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील चाचणीत निरोगी स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. त्यावेळी कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नाहीत. ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले. इंट्रानेजल व्हॅक्सिनच्या (Intra Nasal Vaccine) बुस्टर डोससाठी ९ ठिकाणी चाचणी करण्यात आली. भारत बायोटेकची ही लस नाकावाटे देण्यात येणार आहे.