sadhguru isha foundation high court case
चैन्नई : सदगुरू जग्गी वासुदेव आणि त्यांचा आश्रम असलेले ईशा फाऊंडेशन हे सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. हाय कोर्टाने ईशा फाऊंडेशनला इतरांना विवाह न करण्याच सल्ला देण्याबाबत प्रश्न केला आहे. एका निवृत्त प्राध्यापकाने ईशा योगा केंद्राविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सध्या सुनावणी पार पडत असून लग्न न करण्याची शिकवण आश्रमाकडून दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. कारवाईचा भाग म्हणून देशभरातील ईशा योगा केंद्राच्या काही शाखांवर छापेही टाकण्यात आले आहेत. यावर आता ईशा फाऊंडेशनकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
सदगुरू जग्गी वासुदेव यांच्याविरोधामध्ये तमिळनाडूतील माजी प्राध्यापक एस. कामराज यांनी याचिका दाखल केली आहे. ईशा फाऊंडेशनमध्ये ब्रेनवॉशिंग करून दोन मुलींना ठेवण्यात आल्याचे याचिकेमध्ये म्हटले आहे. त्या मुलींना संसारात न रमता परमार्थ व संन्यासी जीवन जगावे असे सांगितले आहे. या प्रकरणातील सुनावणीवेळी न्यायालयाने “एक इसम ज्यांनी स्वतःच्या मुलीचं लग्न लावून दिलं आहे. त्यांची मुलगी इतर लोकांप्रमाणे संसारिक जीवन जगत आहे. तो इसम इतरांच्या मुलींना केशवपन करण्यासाठी व संन्यासी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित का करतोय?” असा प्रश्न सदगुरू जग्गी वासुदेव यांना कोर्टाने विचारला. यावर आता ईशा फाऊंडेशनकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
हे देखील वाचा : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम तुरुंगाबाहेर; निवडणुकीपूर्वीच मिळाला पॅरोल
ईशा फाऊंडेशनकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये लग्न करायला लावत असल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ईशा फाउंडेशनची स्थापना सद्गुरूंनी लोकांना योग आणि अध्यात्म देण्यासाठी केली होती. आमचा असा विश्वास आहे की प्रौढ व्यक्तींना त्यांचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आणि शहाणपण आहे. आम्ही लोकांना लग्न करण्यास किंवा भिक्षुत्व, संन्यास स्वीकारण्यास सांगत नाही. कारण या प्रत्येकाच्या वैयक्तिक निवडी आहेत. ईशा योग केंद्र हे हजारो लोकांचे घर आहे. जे संन्यासी नाहीत आणि काही ज्यांनी ब्रह्मचर्य किंवा भिक्षुत्व घेतले आहे.
Isha Foundation says, “Isha Foundation was founded by Sadhguru to impart yoga and spirituality to people. We believe that adult individual human beings have the freedom and the wisdom to choose their path. We do not ask people to get married or take up monkhood as these are… pic.twitter.com/nb5fTsIaGX
— ANI (@ANI) October 2, 2024
असे असूनही, संन्यासांना न्यायालयासमोर हजर करावे, अशी याचिकाकर्त्याची इच्छा होती आणि संन्याशांना न्यायालयासमोर हजर देखील करण्या आले. त्या सर्वांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते त्यांच्या इच्छेने ईशा योग केंद्रात राहत आहेत. आता हे प्रकरण न्यायालयाने प्रविष्ठ आहे. आम्हाला आशा आहे की सत्याचा विजय होईल आणि निर्माण झालेल्या सर्व अनावश्यक वादांचा अंत होईल.
हे देखील वाचा : चिराग पासवान केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडणार का? चर्चांवर स्वतः दिलं स्पष्टीकरण
यापूर्वी, या याचिकाकर्त्याने इतरांसह, ईशा फाऊंडेशनद्वारे बांधण्यात येत असलेल्या स्मशानभूमीच्या सभोवतालच्या वस्तुस्थितीची चौकशी करण्यासाठी तथ्य शोध समिती असल्याच्या खोट्या बहाण्याने आमच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ईशा योग केंद्राच्या लोकांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली. या विरोधात मद्रासच्या उच्च न्यायालयाने पोलिसांनी अंतिम अहवाल सादर करण्यास स्थगिती दिली आहे. याशिवाय फाउंडेशनवर अन्य कोणताही गुन्हा दाखल नाही. फाउंडेशनच्या विरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल.