
ISRO Chandrayaan Mission-4:
तसेच भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळयान २०२७ पर्यंत प्रक्षेपित करण्याच्या योजनेवर काम केले जात आहे. इसोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी इस्रो अंतराळयान उत्पादनक्षमतेला तीनपट वाढविणार असल्याचे सांगितले आहे. मानवरहित परीक्षण मोहीम भारताच्या’ गगनयान’चे केवळ वेळापत्रक बदलण्यात आले आहे. मानवरहित मोहीम चालू वर्षातच पार पडण्याचे नियोजन होते, तर मानवयुक्त मोहिमेची योजना नेहमीच २०२७ साठी आखण्यात आली होती.
इस्त्रो २०३५ पर्यंत स्वतःचे भारतीय अंतराळस्थानक निर्माण करण्यावरही काम करत आहे, याच्या 5 मॉडयूल्सपैकी पहिला २०२८ पर्यंत कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे. यामुळे स्वतः चे अंतराळ स्थानक असलेला भारत तिसरा देश ठरणार आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे आयुर्मान संपुष्टात येण्याच्या नजीक आहे, तर चीनचे तियांगोंग पूर्णपणे कार्यान्वित आहे.
नारायणन म्हणाले की, २०३३ पर्यंत भारताची अंतराळ अर्थव्यवस्था ४४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सध्या जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा सुमारे २ टक्के आहे आणि २०३० पर्यंत तो ८ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी इस्रो प्रयत्नशील आहे.
सध्या भारताची अंतराळ अर्थव्यवस्था अंदाजे ८.२ अब्ज डॉलर्स आहे. याच्या तुलनेत जागतिक अवकाश अर्थव्यवस्था जवळपास ६३० अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि २०३५ पर्यंत ती १.८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अंतराळ क्षेत्रातील अलीकडील सुधारणांमुळे खाजगी क्षेत्रातील सहभाग झपाट्याने वाढला आहे. भारताच्या अंतराळ परिसंस्थेत सध्या ४५० हून अधिक उद्योग आणि ३३० स्टार्टअप्स सक्रिय आहेत. काही वर्षांपूर्वी केवळ तीन स्टार्टअप्स असताना, ही झालेली वाढ लक्षणीय आणि उल्लेखनीय मानली जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोला भारतीय अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणण्याच्या दिशेने काम करण्याचा निर्देश दिला आहे. भारताची दीर्घकालीन मानव-अंतराळ उड्डाण योजना जगातीच्या अग्रगण्य अंतराळशक्तींमध्ये स्थान मिळवून देणार आहे. अमेरिका आर्टेमिसच्या अंतर्गत चंद्रावर