श्रीहरीकोटाहून इस्रोच्या रॉकेटद्वारे युरोपियन सूर्य निरीक्षण उपग्रह प्रोबा-3 यशस्वीरीत्या प्रक्षेपित; अतंराळात सूर्यग्रहणाची प्रतिकृती निर्माण केली जाणार
नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या कार्यक्षम ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (PSLV)द्वारे युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)च्या प्रोबा-3 उपग्रहाचे श्रीहरीकोटाहून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. उपग्रहांमध्ये आढळलेल्या ‘तांत्रिक त्रुटी’मुळे हे प्रक्षेपण काल स्थगित करण्यात आले होते.
उपग्रहाच्या सहाय्याने अतंराळामध्ये सूर्यग्रहणाची प्रतिकृती निर्माण करणार
पीएसएलव्हीच्या 61 व्या उड्डाणादरम्याने, प्रोबा-3 या अत्यंत अद्वितीय युगुल उपग्रहांना अतंराळात प्रक्षेपित करण्यात आले आहे. या उपग्रहाच्या सहाय्याने अतंराळामध्ये सूर्यग्रहणाची प्रतिकृती निर्माण करण्यात येणार आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्षेपणाचे उद्दिष्ट प्रोबा-3 यानाला अतीदिर्घकाळार वर्तूळ कक्षेत स्थापित करणे आहे. हे संपूर्ण प्रक्षेपण इस्रोच्या व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) मार्फत व्यावसायिक प्रकल्पांतर्गत करण्यात आले.
हे देखील वाचा-
युरोपियन स्पेस एजन्सीच्या इन-ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन प्रकल्प
प्रोबा-3 हा युरोपियन स्पेस एजन्सीच्या इन-ऑर्बिट डेमॉन्स्ट्रेशन (IOD) प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्रगत तंत्रज्ञानाने युक्त ‘फॉर्मेशन फ्लाइंग’क्षमतेचे प्रात्यक्षिक सादर करतो. प्रोबा-3 मध्ये दोन उपग्रहांचा समावेश आहे. पहिला कोरोनोग्राफ स्पेसक्राफ्ट (CSC) आणि दुसरा ऑक्ल्टर स्पेसक्राफ्ट (OSC). हा उपग्रह 545 किलोग्रॅम वजनाचे आहेत. तसेच, हे उपग्रह पीएसएलव्ही रॉकेटद्वारे एकत्रितरित्या अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले.
🔔 Final Countdown: 10 minutes to liftoff!
PSLV-C59/PROBA-3, a collaboration of NSIL, ISRO, and ESA, is moments away from launching ESA’s PROBA-3 satellites into a highly elliptical orbit.
📺 Witness this milestone LIVE: https://t.co/hZULgfM41Y
🌐 For more info:… pic.twitter.com/bF31wCJbkO
— ISRO (@isro) December 5, 2024
उपग्रहाचे वैशिष्ट्ये
या उपग्रहांची 44.5 मीटर उंची असून हे, 320 टन वजनाच्या पीएसएलव्हीने हे उपग्रह 600 किलोमीटर उंचीवरील कक्षेत प्रक्षेपित केले. प्रक्षेपणानंतर अवघ्या 18 मिनिटांत उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात तैनात झाले. प्रोबा-3 मिशनची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे दोन उपग्रहांमध्ये प्रगत ‘फॉर्मेशन फ्लाइंग’ क्षमता आहे. हे उपग्रह एकमेकांपासून ठराविक अंतरावर आणि अचूक स्थितीत उड्डाण करतात. यामुळे अंतराळात सुर्यग्रहणाचे अनुकरण करणे शक्य होते.
2001 साली प्रोबा-1 उपग्रह लॉंच
इस्रोच्या मते, प्रोबा-3 ही युरोपियन स्पेस एजन्सीची आणि जगातील पहिली अचूक ‘फॉर्मेशन फ्लाइंग’ मिशन आहे. अंतराळात हे उपग्रह जणू एकाच संरचनेप्रमाणे काम करतील. यापूर्वी 2001 साली याच पीएसएलव्ही रॉकेटद्वारे प्रोबा-1 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. हा उपग्रह अपेक्षित कालावधी ओलांडून दोन दशके कार्यरत राहिला आहे. प्रॉबा-3 प्रकल्पाने इस्रोच्या आणि ईएसएच्या सहकार्याला एक नवीन शिखर गाठून दिले आहे.
हे देखील वाचा-