भारताचं महत्त्वकांक्षी पहिलं सौर मिशन आदित्य एल-1 (Aditya L1 Mission) यशस्वीरित्या तिसरी कक्षा पार केली आहे. रविवारी आदित्य एल-१ ची कक्षा तिसऱ्यांदा बदलण्यात आली. इस्रोने सांगितले की, बेंगळुरूस्थित ITRAC ने तिसऱ्यांदा आदित्य L-1 ची कक्षा यशस्वीपणे बदलली आहे. आता आदित्य L-1 ची कक्षा 296X71767 किलोमीटर झाली आहे. पृथ्वीच्या कक्षेत 16 दिवस घालवल्यानंतर ते L-1 बिंदूकडे झेप घेईल.
[read_also content=”मोरोक्कोत भूकंपामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू, 2,000 जखमी! https://www.navarashtra.com/world/more-than-2000-people-died-in-morocco-earthquake-so-far-nrps-456040.html”]
याआधी आदित्य एल-1 ची कक्षा दोनदा बदलण्यात आली आहे. 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर 3 सप्टेंबर रोजी प्रथमच त्याची कक्षा बदलण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी, थ्रस्टर्सला दुसऱ्यांदा गोळीबार करून त्याची कक्षा बदलण्यात आली. ही प्रक्रिया आतापर्यंत तीन वेळा झाली आहे. आदित्य एल-1 ची कक्षा आणखी दोनदा बदलली जाईल. यानंतर ती लांबच्या प्रवासाला निघेल. आता हीच प्रक्रिया 15 सप्टेंबरला पुन्हा एकदा होणार आहे.
आदित्य एल-1 चे तिसरे अर्थ-बाऊंड ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वीपणे पार पडलं आहे. यानंतर हा उपग्रह पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचला आहे. इस्रोने एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
Aditya-L1 Mission:
The third Earth-bound maneuvre (EBN#3) is performed successfully from ISTRAC, Bengaluru.ISRO’s ground stations at Mauritius, Bengaluru, SDSC-SHAR and Port Blair tracked the satellite during this operation.
The new orbit attained is 296 km x 71767 km.… pic.twitter.com/r9a8xwQ4My
— ISRO (@isro) September 9, 2023
आदित्य एल-1 ही भारताची पहिलीच सौर मोहीम आहे. 2 सप्टेंबर रोजी याचं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं होतं. सूर्याचा अधिक जवळून अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी आदित्य हा उपग्रह पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या एल-1 या पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येईल.