Jagdeep Dhankhar After resignation first attended public events, oath ceremony of Vice President at Raj Bhavan
Jagdeep Dhankhar in Raj Bhavan : नवी दिल्ली : मागील अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज भवनामध्ये उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. एनडीएचे सी पी राधाकृष्णन यांनी भारताचे 15 वे उपराष्ट्रपती पदाची धुरा स्वीकारली आहे. माजी उपराष्ट्रपती असलेलेल जगदीप धनखड यांनी अचानकपणे राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक पार पडली. धनगड यांचा राजीनामा हा संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय ठरला. राजीनाम्यानंतर जगदीप धनखड हे माध्यमांसमोर आलेले नव्हते. त्याच्याबाबत कोणतीही माहिती समोर येत नसल्यामुळे विरोधकांनी संशय व्यक्त केला होता. अखेर जगदीप धनखड हे शपथविधी कार्यक्रमामध्ये दिसून आले आहेत.
राजभवनामध्ये उपराष्ट्रपती पदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील नेते उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यासाठी माजी उपराष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले होते, ही एक स्थापित संवैधानिक परंपरा आहे. जगदीप धनखड यांनीही परंपरेचे पालन करत या महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थिती लावली. धनखड यांच्यासोबत इतर अनेक नेते सामील झाले. समारंभादरम्यान, जगदीप धनखड इतर वरिष्ठ नेत्यांसह व्यासपीठावर बसलेले दिसले. त्यांच्या शेजारी आणखी एका ज्येष्ठ नेत्याच्या उपस्थितीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
धनखड यांच्यासोबत कोण कोण होते?
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि माजी उपराष्ट्रपती धनखड हे शेजारी बसले होते. आणखी एक माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी देखील नायडू यांच्या शेजारी बसले होते. विशेष म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला देखील जगदीप धनखड ज्या रांगेत बसले होते त्याच रांगेत बसलेले दिसले. यावेळी जगदीप धनखड हे नेत्यांसोबत गप्पा मारताना दिसून आले. त्यामुळे जगदीप धनखड यांच्याबाबत संशय उपस्थित करणाऱ्या नेत्यांना चपराक मिळाली आहे.
आरोग्याच्या कारणास्तव दिला होता राजीनामा
जगदीप धनखड यांनी अलीकडेच पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर लगेचच त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सादर केला. राजीनाम्यानंतर त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले होते. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. यानंतर जगदीप धनखड हे पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर दिसून आले. धनखड यांचा राजीनामा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या आरोग्याच्या स्थितीपासून ते भविष्यातील योजनांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. याशिवाय, त्यांच्या नवीन शासकीय निवासस्थानाबद्दलही बरीच चर्चा झाली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंतप्रधानांपासून अनेक राजकीय नेते उपस्थित
उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्र सरकारचे अनेक वरिष्ठ मंत्री शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांनी उपस्थिती लावली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्र सरकारचे अनेक वरिष्ठ मंत्री शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते.