
Jaish-e-Mohammad's female commander Dr. Shaheen Shahid has confessed to terror plot
Delhi Red Fort Blast: नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये सोमवारी (दि.10) सायंकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला.या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला आता प्रचंड वेग आला आहे. प्राथमिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील स्फोट हा सामान्य आत्मघातकी बॉम्बस्फोटासारखा नव्हता, तर संशयिताने घाबरून घाईघाईत तो घडवून आणल्याचे संकेत आहेत. या या हल्ल्याच्या तपासात एक मोठा खुलासा झाला आहे. सुरक्षा यंत्रणांनी स्फोटापूर्वी जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर डॉ. शाहीन शाहिद हिला अटक केली होती. या चौकशीदरम्यान तिने दहशतवादी कटाची कबुली दिली आहे.
सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या स्फोटात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. याची उच्च स्तरीय चौकशी सुरु असून यामध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. भारतातील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) ची महिला कमांडर डॉ. शाहीन शाहिद हिने तपास यंत्रणांसमोर कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून स्फोटके साठवत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे ध्येय भारतात मोठे दहशतवादी हल्ले करणे असे होते.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
कट रचणारे अमोनियम नायट्रेटचा करत होते साठा
चौकशीदरम्यान डॉ. शाहीनने अनेक खुलासे केले आहेत. तिने सांगितले की ती तिचे सहकारी मुझम्मिल आणि आदिल यांच्यासोबत अमोनियम नायट्रेटसारखे स्फोटके साठवत होती. ही संपूर्ण कारवाई जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केली जात होती. चौकशीदरम्यान, शाहीनने असेही उघड केले की जेव्हा जेव्हा ती डॉ. उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने जाहीर करायचा की ते देशभरात असंख्य दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत आहेत. सुरक्षा संस्था शाहीन शाहिदची सतत चौकशी करत आहेत आणि दिल्ली बॉम्बस्फोटांशी संबंधित आणखी अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येऊ शकतात असा दावा केला जात आहे.
CCTV फुटेज आणि I20 कारची ओळख
तपास यंत्रणांनी लाल किल्ला स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या आय२० कारचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळवले आहे. फुटेजमध्ये मेट्रो स्टेशन पार्किंगमधून कार बाहेर पडताना दिसत आहे, ज्यामध्ये काळा मुखवटा घातलेला एक माणूस होता. असे म्हटले जात आहे की हा माणूस काश्मीरचा रहिवासी उमर नबी होता. या कटाच्या संदर्भात तपास यंत्रणांनी मुफ्ती इरफानलाही अटक केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
फरिदाबाद विद्यापीठातील डॉक्टरांना ताब्यात
या दहशतवादी कटाशी संबंध समोर आल्यानंतर फरिदाबाद विद्यापीठाचे अल-फलाह विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी सखोल चौकशीसाठी विद्यापीठातील सात डॉक्टरांसह एकूण १३ जणांना ताब्यात घेतले आहे. स्फोटाचा कट रचणाऱ्या डॉक्टरांनी टेलिग्रामचा वापर करून संवाद साधला का याचाही तपास तपास यंत्रणा करत आहेत.