कुंकूच राहिलं नाही आणि ऑपरेशन मात्र 'सिंदूर', कोण आहेत हे लेखक; जया बच्चन राज्यसभेत भडकल्या
ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू असून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या नावावरून राज्यसभेत भडकल्या. जर महिलांचं कुकूंच राहिलं नाही तर त्याचा बदला घोणाऱ्या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं. तुमच्याकडे मोठे लेखक आहेत, जे मोठी मोठी नावं घेतात. मग हे नाव कोणी दिलं. असा आक्षेप जया बच्चन यांनी घेतला.
‘म्हणून सभागृहात ट्रम्प यांचं नावं घेतलं नाही’; राहुल गांधींचा PM नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर बोलताना जया यांनी प्रथम त्या पीडित कुटुंबांना श्रद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या की दहशतवादी कसे आले आणि इतके लोक कसे मारले. त्या घटनेबद्दल मला खूप वाईट वाटते. पण एका गोष्टीची खंत वाटते ती म्हणजे या ऑपरेशनचं नाव. महिलाचं कुंकू पुसलं गेलं आणि त्यांच्या कुंकूवारून नावं कसं ठेवता. तुमच्या कडे मोठे लेखक आहेत जे मोठी नावं घेतात. पण हे नाव सिंदूर कोणी दिले? असा सवाल त्यांनी केला.
जे प्रवासी पहलगामला गेले होते. ते तिथे का गेले. ३७० हटवल्यानंतर दहशतवात संपवला म्हणून हे छाती ठोकपणे सांगत होते. काश्मीर आमच्यासाठी स्वर्ग आहे पण त्या बदल्यात त्यांना काय मिळाले? या सरकारने तिथे गेलेल्या आणि या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांचा विश्वास गमावला आहे. ती कुटुंबं तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाहीत.
दम असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांना खोटं ठरवा; राहुल गांधींचं PM मोदींना ओपन चॅलेंज
सरकारने त्या कुटुंबांची माफी मागितली का? हे आमचे कर्तव्य आहे. तुम्ही माफी मागितली पाहिजे. संरक्षण मंत्री त्या दिवशी (सोमवार) मोठे बोलत होते. आम्ही तोफा, दारूगोळा खरेदी केला, हे खरेदी केलं ते खरेदी केलं. आपण याबद्दल काय करावे? आपण त्या २६ लोकांचे प्राण वाचवू शकलो का? दारूगोळा काहीही करू शकणार नाही. मानवता असली पाहिजे. लोकांनी तुम्हाला ज्या आशेने आणि विश्वासाने येथे पाठवले आहे त्याची काळजी घ्या. तुम्हाला दिलेल्या पदाचे रक्षण करा, अशा शब्दात जया बच्चन यांनी सुनावलं आहे.