'म्हणून सभागृहात ट्रम्प यांचं नावं घेतलं नाही'; राहुल गांधींचा PM नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारत सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरवर काल संसदेत वादळी चर्चा झाली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक आरोप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. कोणत्याही जागतिक नेत्याने भारत पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा केली नाही की मध्यस्थी केली नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून आज राहुल गांधी यांनी पुन्हा हल्ला चढवला. अमेरिकेचे अध्यक्ष संपूर्ण सत्य सांगून टाकतील, याची भीती मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी सभागृहात त्यांचं नाव घेतलं नाही, असा आरोप केला आहे.
Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं
संसदेच्या परिसरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी हे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मध्यस्थीबाबतचा दावा करताना अध्यक्ष ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही. जर त्यांनी नावं घेतलं असतं तर ट्रम्प यांनी त्यावेळी जे काही घडलं ते सर्व सांगून टाकलं असतं, याची त्यांना माहिती आहे. नक्की काय घडलं हे संपूर्ण जगाला माहिती आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्री ने ट्रंप का नाम नहीं लिया। ये सबको मालूम है क्या हुआ है और प्रधानमंत्री बोल नहीं पा रहे हैं।
अगर PM ने बोल दिया, तो ट्रंप खुलकर बोलेंगे और पूरी सच्चाई रख देंगे, इसलिए प्रधानमंत्री बोल नहीं पा रहे हैं।
ट्रंप बार-बार एक ही बात को इसलिए दोहरा रहे हैं, क्योंकि वो… pic.twitter.com/qswPufD5Sl
— Congress (@INCIndia) July 30, 2025
“ट्रम्प खोटे बोलत आहेत असं मोदींनी म्हटलेलं नाही. काय घडलं, हे सर्वांना माहिती आहे. हे वास्तव असताना, ते बोलूही शकत नाहीत. जर पंतप्रधानांना त्याच्याविषयी काहीही बोललं तर ते ट्रम्प उघडपणे बोलतील आणि संपूर्ण सत्य सांगतील. म्हणूनच ते काहीही बोलत नाहीत. सध्या ट्रम्प यांना भारतासोबत व्यापार करार हवा आहे. तो करार करताना ट्रम्प दबाव आणतील. कोणत्या प्रकारचा व्यापार करार केला जातो हे समजेलच, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री दोघांनीही उडवाउडवीची उत्तरं दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटं बोलत आहेत, असं त्यांनी स्पष्ट सांगांवं.
#WATCH दिल्ली: कांग्रेस सांसद प्रियंका गांधी वाड्रा ने कहा, “प्रधानमंत्री मोदी और विदेश मंत्री ने गोलमोल बात कही है। उन्हें सीधा कहना चाहिए कि अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप झूठ बोल रहे हैं।” pic.twitter.com/feSXHRmj46
— ANI_HindiNews (@AHindinews) July 30, 2025
काँग्रेसकडून सतत होत असलेल्या आरोपांदरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानसोबतच्या युद्धबंदीबाबत कोणत्याही तृतीय पक्षाकडून मध्यस्थी करण्यात आली नव्हती. “याचा प्रश्नच उद्भवत नाही.” २२ एप्रिल ते १६ जून दरम्यान फोनवर संभाषण झाले नाही. लष्करी कारवाई थांबवण्याचा व्यापाराशी काहीही संबंध नाही. २२ एप्रिल ते १६ जून दरम्यान पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही फोनवर संवाद झाला नाही असेही त्यांनी सांगितले.
दम असेल तर डोनाल्ड ट्रम्प यांना खोटं ठरवा; राहुल गांधींचं PM मोदींना ओपन चॅलेंज
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत असेही म्हटले की जगातील कोणत्याही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी मध्यस्थी केली नाही. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प वारंवार दावा करत आहेत की त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी शक्य झाली. त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर अनेक वेळा हा दावा केला आहे.