Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केजरीवालांच्या स्वीय सहाय्यकाने पोटात बुक्की मारली अन्…; स्वाती मलिवाल यांनी ‘त्या’ संपूर्ण घटनेचा जबाब नोंदवला

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्याविरोधात जबाब नोंदवला आहे. 13 मे रोजी नेमकं काय झालं, त्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी दिल्ली पोलिसांना दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 17, 2024 | 11:48 AM
केजरीवालांच्या स्वीय सहाय्यकाने पोटात बुक्की मारली अन्…; स्वाती मलिवाल यांनी ‘त्या’ संपूर्ण घटनेचा जबाब नोंदवला
Follow Us
Follow Us:
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्याविरोधात जबाब नोंदवला आहे. 13 मे रोजी नेमकं काय झालं, त्या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी दिल्ली पोलिसांना दिली. त्यानंतर आता पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल जेव्हा मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचल्या तेव्हा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी कानाखाली लगावल्याचा, लाथा घातल्याचा, काठीने मारहाण केल्याचा आणि पोटात मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. स्वाती मलिवाल यांनी दावा केला आहे की, मुख्यमंत्री निवासस्थानी बिभव कुमार यांच्याकडून मारहाण होत असताना आपण त्यांना मला सोडून द्या अशी विनंती केली. यानंतर त्या बाहेर आल्या आणि थेट पोलिसांना फोन केला असं तक्रारीत लिहिलं आहे.
स्वाती मलिवाल यांनी सोमवारी कुमारने आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाने या आरोपांची पुष्टी केली आहे. मात्र, याप्रकरणी कोणतीही रीतसर तक्रार दाखल झाली नव्हती. अखेर तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बिभव कुमारविरुद्ध महिलेचा विनयभंग, गुन्हेगारी धमकी, शब्द आणि हावभाव किंवा महिलेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेली कृती आणि स्वेच्छेने दुखापत केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने स्वाती मलिवाल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला. तपास पथकाने तब्बल 4 तास त्यांची चौकशी केली आणि संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्वाती मलिवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत योग्य कारवाई केली जावी अशी आशा व्यक्त केली.
कोण आहे विभव कुमार?
विभव कुमार हे बिहारमधील सासाराम येथील रहिवासी आहे. त्यांनी बीएचयूमधून शिक्षण घेतले आहे. या आधी ईडीने दिल्लीतील अनेक बाबींची संबंधित त्यांची चौकशी केली आली. अण्णांच्या आंदोलनापूर्वीपासून ते अरविंद केजरीवाल यांच्याशी जोडले गेले होते. ते इंडिया अगेन्स्ट कॅप्शन मोहिमेशी सुरुवातीपासूनच संबंधित होते.

Web Title: Kejriwals colleague kicked me complaint filed by swati maliwal nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2024 | 11:48 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.