Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवेतच एअर इंडियाच्या विमानाचा लँडिंग गिअर अडकल्याने मोठा गोंधळ; 140 प्रवाश्यांसह विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

तामिळनाडूमधील त्रिची विमानतळावरून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हवेतच एअर इंडियाच्या विमानाचा लँडिंग गिअर अडकल्याने मोठा गोंधळ उडाला. लँडिंग केल्यानंतर 140 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 12, 2024 | 09:40 AM
An Air India flight made an emergency landing at the Trichy airport in Tamil Nadu

An Air India flight made an emergency landing at the Trichy airport in Tamil Nadu

Follow Us
Close
Follow Us:

त्रिची : शुक्रवारी (दि. 11 ऑक्टोबर) तामिळनाडूतील त्रिची विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. फ्लाइट AXB 613 ने तिरुचिरापल्ली, तामिळनाडू येथून संध्याकाळी 5:40 वाजता उड्डाण केले आणि त्याच विमानतळावर रात्री 8:15 च्या सुमारास उतरले. तिरुचिरापल्ली-शारजाह एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटमध्ये हायड्रोलिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडला.

सुमारे तीन तास हवेत चक्कर मारल्यानंतर वैमानिकाने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. यादरम्यान प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती, परंतु एअरलाइनच्या वरिष्ठ सूत्रांनी मीडियाला सांगितले की कॉकपिटमध्ये नेहमीच गोष्टी नियंत्रणात असतात. तरीही विमान सुखरूप उतरेपर्यंत त्रिची विमानतळावर हाय अलर्ट ठेवण्यात आला होता. लँडिंग केल्यानंतर 140 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

काय म्हणाले विमानतळ संचालक?

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, वैमानिकाने विमानतळाला हायड्रॉलिक बिघाडाची माहिती दिली. नागरी उड्डाण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “तिरुचिरापल्ली ते शारजाहला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे फ्लाइट IX 613 तिरुचिरापल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे. यानंतर DGCA सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. फ्लाइटच्या लँडिंग गिअरमध्ये समस्या निर्माण झाली होती.” .विमानतळ संचालक पुढे म्हणाले की, उड्डाण हवेत असताना इंधन टाकण्याचा विचार केला होता, परंतु विमान लोकवस्तीच्या परिसरात फिरत असल्याने तसे करणे योग्य वाटले नाही, असेही सांगितले बेली लँडिंग फ्लाईट आणि आम्ही यासाठी आधीच सर्व व्यवस्था केली होती, जेणेकरून गरज पडल्यास मदत घेता येईल.

येथे जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

शुक्रवारी रात्री एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यावेळी या फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी होते. जेव्हा विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याची परिस्थिती होती तेव्हा हवेत प्रदक्षिणा घालून विमानाचे इंधन कमी केले जात होते, जेणेकरून आपत्कालीन लँडिंग करणे सोपे होईल आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. रिपोर्टनुसार, एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX 613 ने त्रिची विमानतळावरून संध्याकाळी 5.32 वाजता उड्डाण केले. पायलटने उड्डाण करताच त्याला लँडिंग गियरच्या हायड्रॉलिक सिस्टममध्ये बिघाड आढळला. यानंतर इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागण्यात आली. या कालावधीत विमानाने हवेत ३ तासांहून अधिक वेळ फिरून इंधन कमी केले. अग्निशमन दलासह 20 हून अधिक रुग्णवाहिकाही येथे तैनात करण्यात आल्या होत्या.

हे देखील वाचा : भारतीय लष्कराला लवकरच ‘हे’ शक्तिशाली शस्त्र मिळणार; 1800 फूट उंचीवरही करू शकते मारा

एअर इंडिया एक्सप्रेसचे प्रवक्ते काय म्हणाले?

दरम्यान, जमिनीवर इमर्जन्सी लँडिंगची तयारी करण्यात आली होती. तिरुचिरापल्ली विमानतळाचे संचालक गोपालकृष्णन यांनी सांगितले की, 20 रुग्णवाहिका आणि 18 अग्निशमन गाड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आणि विमान वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) समन्वय साधत आहे. शेवटी, एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि आमच्या कामकाजाच्या प्रत्येक पैलूमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.

हे देखील वाचा : काळे सोने म्हटले जाणारे ‘Hydrogen Fuel’ कसे तयार केले जाते? जे आणणार जगात नवीन क्रांती
 

विमान तासनतास आकाशात प्रदक्षिणा घालत राहिले

त्रिची-शारजाह फ्लाइटमध्ये हा प्रकार घडल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर, बेली लँडिंगची तयारी देखील केली गेली, परंतु त्याची आवश्यकता नव्हती. वैमानिकाच्या शहाणपणामुळे विमान विमानतळावर यशस्वीपणे उतरले. विमानातील प्रवाशांना केवळ तांत्रिक बिघाडाची माहिती देण्यात आली. विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याची माहिती वैमानिकाला मिळताच वैमानिकाने एटीसीला माहिती दिली. यानंतर विमान त्रिचीच्या आकाशात प्रदक्षिणा घालत राहिले. विमान उतरवताना मोठी दुर्घटना टाळता यावी यासाठी खाली विमानतळावर सर्व व्यवस्था करण्यात आली होती.

Web Title: Landing gear of air india plane gets stuck in mid air causing huge commotion emergency landing of a plane with 140 passengers nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 09:38 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.