Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election 2025: महायुतीत लढायचं की स्वतंत्र? स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांबाबत भाजपचा मोठा निर्णय

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्ष — भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 12, 2025 | 09:14 AM
Local Body Election 2025:

Local Body Election 2025:

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांबाबत भाजपचा मोठा निर्णय
  • निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर
  • निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर

Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महायुतीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वबळावर, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. त्यासंदर्भातील सर्व अधिकार जिल्हाध्यक्षांना देण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली. पण त्याचवेळी या निर्णयामुळे महायुतीतील मित्रपक्षांना कोणताही त्रास होणार नाही, याचीही खबरदारी घेतली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.

ICC Women Cricket World Cup Points Table : इंग्लंडने मारली विजयाच्या हॅट्रिक! गुणतालिकेचे गणित झाले उलटे सुलटे

मुंबईत झालेल्या कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांबाबतची भूमिका ठरवण्यात आली. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठीची रणनीती, पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा आणि स्थानिक स्तरावरील महायुती समन्वयावरही चर्चा झाली.

पक्षाने आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत, याचा निर्णय जिल्हा पातळीवर घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांना हा निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, आपण महायुतीचा घटक आहोत, हे भान ठेवूनच निर्णय घ्यावा आणि भूमिका मांडावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

आपण वेगवेगळे लढलो तरी महायुतीतील मित्रपक्षांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या लोकांना पक्षात प्रवेश देताना जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करावे आणि संघटन अधिक मजबूत करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केले.

आपण महायुतीत आहोत, याचा विचार करून एकमेकांवर टीका कराव्यात, असा सल्लाही पदाधिकाऱ्यांना देण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सध्या अॅक्शन मोडवर आले आहेत. ते राज्यातील सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी कार्यकर्त्यांचा मूड जाणून घेत आहेत.

Todays Gold-Silver Price: अबब! 24 तासांत तब्बल 6 हजार रुपयांनी वाढले चांदीचे दर, आजचा भाव वाचून तुम्ही

या बैठकींमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी “शिंदेंबरोबर चालेल, पण अजितदादांसोबत जाणं नको” अशी भूमिका मांडली आहे. तरीही, काहीही झालं तरी महायुतीत एकत्र राहूनच लढायचं, हा संदेश भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून सातत्याने दिला जात आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील तिन्ही पक्ष — भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सध्या अॅक्शन मोडमध्ये असून, सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा कल जाणून घेत आहेत. या बैठकींमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी “शिंदेंबरोबर चालेल, पण अजितदादांसोबत जाणं नको” अशी भूमिका मांडली आहे. तर त्यानंतरही, काहीही झालं तरी निवडणुका महायुतीतूनच लढायच्या, हा स्पष्ट संदेश भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते देत आहेत.

Numerology: या मूलांकांच्या लोकांना होतील फायदेच फायदे, प्रत्येक क्षेत्रात मिळेल अपेक्षित यश

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना सल्ला दिला की, आपण वेगवेगळे लढलो तरी महायुतीतील मित्रपक्षांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच, नव्या कार्यकर्त्यांना प्रवेश देताना जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून संघटना अधिक मजबूत करावी. महायुतीतील तिन्ही पक्षांना हे जाणवले आहे की, पदाधिकाऱ्यांची इच्छा काहीही असो, निवडणुका अखेर महायुती म्हणूनच लढवाव्या लागणार आहेत. त्यामुळेच स्वबळाची भाषा मोठे नेते सध्यातरी टाळताना दिसत आहेत.

 

Web Title: Local body election 2025 should you contest in a grand alliance or independently bjps big decision regarding local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 09:14 AM

Topics:  

  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…
1

Maharashtra Politics: निवडणुकीत महायुती म्हणून लढणार? CM फडणवीसांचे विधान चर्चेत; म्हणाले…

Local Body Election 2025: काँग्रेसचा मनसेला सोबत घेण्यास नकार; काँग्रेसचा मनसेला सोबत घेण्यास नकार
2

Local Body Election 2025: काँग्रेसचा मनसेला सोबत घेण्यास नकार; काँग्रेसचा मनसेला सोबत घेण्यास नकार

Pune News: पंचायत समितीमध्ये ‘महिलाराज’; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी…
3

Pune News: पंचायत समितीमध्ये ‘महिलाराज’; पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ ठिकाणी…

Maval News : वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर: महिलांचे इथेही दिसले वर्चस्व!
4

Maval News : वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर: महिलांचे इथेही दिसले वर्चस्व!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.