फोटो सौजन्य - ICC Cricket World Cup
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषकाचा सामना आज रंगणार आहे हा सामना विशाखापटनम मध्ये खेळायला जाणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत यातील दोन विजय तर एक पराभव आहे. काल श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला या सामन्यात इंग्लंडच्या संघाने विजयाची हॅट्रिक मारून पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर उडी मारली आहे. या विजयासह गुणतालिकेचे गणित देखील पूर्णपणे बदलले आहे.
इंग्लंडचा संघ सध्या विश्वचषकामध्ये दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. तीन सामन्यांमध्ये तीन विजय मिळवून अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियन संघ आहे, ऑस्ट्रेलियाच्या संघाचा आतापर्यंत तीन सामने झाले आहेत, यामध्ये श्रीलंके विरुद्ध सामना हा पावसामुळे धुवून गेल्या नंतर त्यांना दोघांना एक एक गुण मिळाला होता तर उर्वरित दोन सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळविण्यात यश मिळाले आहे आज त्यांचा सामना भारताविरुद्ध होणार आहे.
भारताचा नेट रन रेट +०.९५३ आहे आणि त्याचे ४ गुण आहेत, तर इंग्लंड ६ गुणांसह आणि नेट रन रेट +१.८६४ सह पहिल्या स्थानावर आहे. जर टीम इंडियाने आज ऑस्ट्रेलियाला हरवले तर त्यांचे ६ गुण होतील, परंतु नेट रन रेटमध्ये इंग्लंडला मागे टाकण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियावर मोठा विजय नोंदवावा लागेल.
संघ | सामना | विजय | पराभव | टाय | निकाल नाही | गुण | रन रेट |
---|---|---|---|---|---|---|---|
इंग्लड | 3 | 3 | 0 | 0 | 1 | 6 | +1.960 |
ऑस्ट्रेलिया | 3 | 2 | 0 | 0 | 0 | 5 | +1.757 |
भारत | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | +0.959 |
दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | -0.888 |
बांग्लादेश | 2 | 1 | 1 | 0 | 0 | 1 | +0.573 |
श्रीलंका | 2 | 0 | 1 | 0 | 1 | 2 | -1.255 |
न्यूजीलैंड | 2 | 1 | 1 | 0 | 0 | 0 | -1.485 |
पाकिस्तान | 3 | 0 | 3 | 0 | 0 | 0 | -1.887 |
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडने ५० षटकांत ९ गडी गमावून २५३ धावा केल्या. कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने ११७ धावांची शानदार खेळी केली. नॅट सायव्हर-ब्रंटच्या खेळीवरून हे स्पष्ट होते की या सामन्यात इतर फलंदाज निष्प्रभ ठरले. कर्णधाराशिवाय इतर कोणताही इंग्लिश फलंदाज ३५ धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने ३ बळी घेतले.
२५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेला पूर्ण ५० षटके टिकवता आली नाहीत आणि त्यांना इंग्लंडच्या १६४ धावांपुढे पराभव पत्करावा लागला. इंग्लंडची गोलंदाजी प्रभावी होती, सोफी एक्लेस्टोनने तिच्या १० षटकांत फक्त १७ धावा देत चार विकेट्स घेतल्या, ज्यात तीन मेडन षटकांचा समावेश होता.