Mumbai Elections: आतापर्यंत आम्ही जनतेच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नामुळेच जनता पुन्हा आमच्या हाती सत्ता देईल, असा विश्वास गीता गवळी यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला शह देण्यासाठी महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र राज्यातील इतर काही महानगरपालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळी समीकरणे दिसण्याची शक्यता आहे.
Pune News: सर्वोच्च न्यायालयाने २०१७ च्या प्रमाणे आरक्षण कायम ठेवत निवडणुकीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टळणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.
बिहारमध्ये मेलेली माणसं जिवंत दाखवतात, जिवंत माणस मेलेली दाखवतात, हे सुप्रीम कोर्टासमोर आले आहे. हा तर मोदींचा फंडा आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
Maharashtra Politics: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका होण्याआधी राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार अशी एक चर्चा रंगू लागली होती.
मराठी भाषेवरून निर्माण झालेल्या वादावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ तब्बल अनेक वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान निवडणुकीत देखील दोन्ही भाऊ एकत्रित येणार असे चित्र सध्या…
Local Body Election: राज्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याचा अंदाज आहे. या निवडणूक टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्याने आता लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. आता निवडणूक ही ओबीसी आरक्षणासह आणि नव्या प्रभाग रचनेसह होणार आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर, तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक राज्य शासनाने तयार केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निश्चीत झाल्या असून सोमवारी जिल्हा परिषदचे ६८ गट आणि पंचायत समितीचे १३६ गणाचे प्रारूप मतदारसंघ जाहीर झाले.
गेल्या ३-४ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. कधी आरक्षण तर कधी वॉर्डरचनेवरून निवडणुका रद्द करण्यात आल्या. सध्या नगरपालिका, महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.
जर सर्व वॉर्डमध्ये ४ सदस्य नसतील तर शेवटचा वॉर्ड ३ किंवा ५ सदस्यांचा बनवावा, असा आदेशात उल्लेख आहे. प्रत्येक प्रभागात संख्येनुसार अ, ब, क, ड अशी व्यवस्था असेल.
maharashtra Politics: उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार याबाबत विचारले असता ते त्यांचे ठरवतील. पण त्या पक्षाचे हितचिंतक असतात त्यांना जे वाटते ते बोलतात, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
या निवडणुकांची प्रक्रिया चार आठवड्यांच्या आत सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.