गेल्या काही दिवसापासून ‘महादेव अॅप’ (Mahadev App) चांगलचं चर्चेत आहे. या बेटिंग अॅपच्या घोटाळ्यात अनेक बड्या हस्तींची नावं आल्यानं या प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं आहे. नुकतचं या प्रकरणी आता तपासासाठी मुंबई पोलिसांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे. आता मात्र, या प्रकरणी नवी माहिती समोर येत आहे. महादेव गेमिंग अॅपचा मालक रवी उप्पलला अखेर दुबईत ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासोबत आणखी २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रवी उप्पल यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
[read_also content=”अयोध्येतील श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरला सुरू होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन! https://www.navarashtra.com/india/shri-ram-international-airport-in-ayodhya-will-open-from-25th-december-nrps-488463.html”]
यासोबतच रवी उप्पल हे एकटे नसून त्याच्याशिवाय 2 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. सर्व भारतीय तपास यंत्रणा दुबई सुरक्षा एजन्सीच्या संपर्कात आहेत. रवी उप्पल हा महादेव अॅपच्या मुख्य आरोपींपैकी एक आहे, तो या गेमिंग अॅपचा मालक असल्याचेही सांगितले जात आहे. त्याला लवकरच अटक करून आकरण्यात येईल.
कथित बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित या मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने ऑक्टोबरमध्ये छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा नोंदवला होता. उप्पल आणि दुसरे महादेव अॅप प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले.
ईडी आता महादेव बेटिंग अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. रवी ही महादेव बुक अॅप सट्टेबाजीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म चालवतो. त्यावर आता भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण हे इतर देशांमध्ये सुरू आहे. छत्तीसगडचा रहिवासी सौरभ चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल दुबई हे चालवतात. या दोघांविरोधात लूक आऊट परिपत्रक जारी करण्यात आले होते.