Mahakumbh 2025 3.5 crore devotees took holy dip at Sangam on Makar Sankranti
नवी दिल्ली: महाकुंभ 2025 चा भव्य सोहळा या वर्षी प्रयागराज येथे सुरू झाला असून, मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानाचा शुभारंभ झाला. या दिवशी संगम तटावर तब्बल 3.5 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले. हा आकाडा आश्चर्यकारक आहे. जगातील 234 देशांपैकी फक्त 45 देशांची लोकसंख्या 3.4 कोटींपेक्षा जास्त आहे, म्हणजे जवळपास 189 देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त भाविक संगम नगरीत एकत्र आले होते. हा संख्यात्मक चमत्कार भारतीय संस्कृती आणि श्रद्धेच्या महत्त्वाची साक्ष देतो.
अमृत स्नानात 13 आखाड्यांचा सहभाग
मकर संक्रांतीच्या मंगल पर्वावर त्रिवेणी संगमावर डुबकी घेतल्याने गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमाचे पवित्र जल श्रद्धेने भरले गेले. या दिवशी पंचायती अखाडा महानिर्वाणी आणि शंभू पंचायती अटल अखाड्याने पहिला ‘अमृत स्नान’ केला. या महाकुंभात एकूण 13 अखाड्यांचा सहभाग असून, त्यांनी या भव्य सोहळ्याची आध्यात्मिक परंपरा जपली आहे. महाकुंभात नागा साधूंनी राख लावलेले शरीर, पारंपरिक शस्त्रास्त्रे आणि डमरू वादनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. भाले, तलवारी, त्रिशूल यांसह साधूंनी केलेले प्रदर्शन प्राचीन परंपरेचा अद्वितीय उत्सव ठरले. नागा साधूंच्या जथ्यासह महिला नागा तपस्वींचाही मोठा सहभाग होता, ज्यांनी या पर्वाचे महत्व अधिक वाढवले.
महाकुंभात किन्नर आखाड्याचाही सहभाग
महाकुंभात ‘किन्नर अखाड्याने’ही आपला सहभाग नोंदवला आणि पवित्र स्नान केले. जूना अखाड्यासोबत त्यांनी डुबकी घेतली. स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या नेतृत्वाखाली नागा साधूंनी रथातून संगम तटावर आगमन केले, त्यांच्या मागे घोडेस्वार आणि त्रिशूलधारी साधूंचा जथ्था होता. या भव्य दृश्याने उपस्थित भाविक थक्क झाले.
जागतिक स्तरावर महाकुंभाची ओळख
अमृत स्नानाच्या वेळी हेलिकॉप्टरमधून गुलाबाच्या पाकळ्याची उधळण करण्याता आली. यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिकतेने भारावून गेले. प्रत्येक 12 वर्षांनी पूर्ण कुंभाचा आणि 144 वर्षांनी महाकुंभाचा आयोजन होतो. अशा पवित्र सोहळ्यात सहभागी होणे हे भक्तांसाठी दुर्मिळ पुण्याचे मानले जाते. महाकुंभाचा उत्स केवळ भारतीय धर्माचा उत्सव म्हणून नव्हे, तर जागतिक श्रद्धेचा एक पवित्र केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गंगा-यमुनेच्या काठी एकत्र आलेल्या कोट्यवधी भाविकांनी श्रद्धा आणि अध्यात्माच्या या महाकुंभाला यशस्वी केले आहे.