जयपूर-अजमेर महामार्गावर भीषण अपघात; एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग, स्फोटांचा दूरवर आवाज
जयपूर : जयपूर-अजमेर महामार्गावर मंगळवारी (दि.7) रात्री भीषण अपघात झाला. एलपीजी सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागली आणि मौजमाबाद परिसराजवळ अनेक स्फोट झाले. अपघातानंतर, ट्रक अचानक आगीच्या ज्वाळांनी वेढला गेला. यामध्ये ट्रकमधील सिलिंडरचा एकामागून एक स्फोट होत राहिले. या स्फोटांचे आवाज दूरवर येत राहिले. याबाबतची माहिती मिळताच बचावपथकही तातडीने सुरु करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. ट्रकला आग कशामुळे लागली याचे कारण समोर आले आहे. या ट्रकला दुसऱ्या एका वाहनाची जोरदार टक्कर झाली. त्यानंतर ट्रकला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, दूरवरून याच्या ज्वाळा दिसून येत होत्या. या अपघातात अनेक लोक जखमी असल्याची माहिती सध्या दिली जात आहे. स्थानिकांनी स्फोटाचा आवाज ऐकला आणि पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर बचावपथक घटनास्थळी दाखल झाले.
हेदेखील वाचा : Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक
दरम्यान, या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्याचे आव्हान समोर होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या डझनभर गाड्या आग विझवण्याचे काम करत होते. मोठ्या स्फोटांमुळे आणि सिलिंडर स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते.
गॅस सिलिंडरने भरलेला होता ट्रक
जयपूर-अजमेर महामार्गावरील मोजमाबादजवळ हा अपघात झाला. ट्रक गॅस सिलिंडरने भरलेला होता. दुसऱ्या वाहनाशी धडकल्यानंतर, मोठा स्फोट झाला आणि मोठमोठ्या ज्वाळा दिसल्या. स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न सुरु झाला.
कर्जत येथे घराला आग
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमधील आंबिवली गावातील एका शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात झाले. घराला आग लागली त्यावेळी घरात कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, घराचे १०० टक्के नुकसान या आगीमध्ये झाले आहे. त्यानंतर आता जयपूर येथे मोठी दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे.