
इंफाळ/मणिपूर : देशाची मान, स्वाभीमान शरमेने खाली घालवणारी घटना मणिपूरमध्ये घडल्याने देशभऱात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. गेले तीन महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. आता या व्हायरल व्हिडीओप्रकरणी (Manipur Viral Video Case) महत्तावाची अपडेट समोर आली आहे. 19 जुलै रोजी समोर आलेल्या व्हिडीओसंदर्भात पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढत त्याचा व्हिडीओ मणिपूरमध्ये दाखवला, या प्रकरणात १९ वर्षीय आरोपीचे नाव समोर आले. दरम्यान, आता याचे पडसाद शेजारील मिझोरममध्ये देखील उमटत आहेत. (Manipur falls in Mizoram; Migration of thousands of Maitei citizens to Mizoram…, what exactly is going on)
मिझोरममध्ये मणिपूरचे पडसाद
मणिपूरमधील हिंसाचाराचे परिणाम शेजारी राज्यांवरही दिसू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. मिझोरममधील मिझो समुदायाचे मणिपूरच्या कुकी-झोमी समाजाशी वांशिक संबंध असून त्यांचे मणिपूरमधील घडामोडींवर बारीक लक्ष आहे. वास्तविक ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत मणिपूरमधील १२,५८४ कुकी-झोमी लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला असल्याचे सांगण्यात आले. अनेकांनी मिझोरम सोडण्यास सुरुवात केली असून मणिपूर सरकारने त्यांना आपल्या राज्यात आणण्यासाठी विमानांची व्यवस्था करण्याची तयारी रविवारी दर्शवली.
मैतेईंनी आपल्या सुरक्षिततेसाठी मिझोरम सोडावे
मिझोरममधील पूर्वाश्रमीच्या दहशतवादी गटाने तेथील मैतेई नागरिकांना राज्य सोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ४१ मैतेई नागरिक मिझोरममधून आसामला आपल्या मूळ गावी पोहोचल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. त्यानंतर मिझोरममधील मैतेईंच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यात मिझोरममधील ‘पीएएमआरए’ (पूर्वाश्रमीची दहशतवादी संघटना- मिझो नॅशनल फ्रंट) या संघटनेने ‘मैतेईंनी आपल्या सुरक्षिततेसाठी मिझोरम सोडावे,’ असा इशारा देणारे मिझो भाषेतील निवेदन शुक्रवारी प्रसारित केल्याने तणावात भर पडली आहे. त्यामुळं आता मणिपूरमधील हिंसाचाराचे परिणाम शेजारी राज्यांवरही दिसू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रमुख आरोपीचे जाळले घर
दुर्दैव, धिंड काढणाऱ्यांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या व्हिडीओमध्ये कांगपोकपी जिल्ह्यातील बी. फायनोम गावात तो ठळकपणे जमावाला मार्गदर्शन करताना दिसत होता. व्हिडिओमध्ये दिसणार्या महिलांपैकी एक माजी सैनिकाची पत्नी आहे. ज्याने भारतीय सैन्यात आसाम रेजिमेंटच्या सुभेदार म्हणून काम केले होते आणि कारगिल युद्धातही तो लढला होता. हे लक्षात घेतले पाहिजे की, व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात एक महिन्यापूर्वी 21 जून रोजी कांगपोकपी जिल्ह्यातील सैकुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.