मणिपूर : मणिपूर पुन्हा एकदा हिंसाचाराच्या आगीत होरपळत आहे. नुकतेच मैतेई समाजातील महिला आणि मुलांचे मृतदेह सापडल्यानंतर राज्यात हिंसाचार उसळला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, मणिपूरसंदर्भात एका अहवालात मोठा खुलासा झाला आहे. अहवालानुसार, मणिपूरमध्ये 15 ते 20 वर्षे वयोगटातील मुलींना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
अहवालानुसार, मणिपूरमध्ये मुलींना 45 दिवसांचे प्रशिक्षण दिले जात असून प्रत्येक बॅचमध्ये 50-50 मुलींचा समावेश आहे. ही प्रशिक्षण केंद्रे मणिपूरच्या ककचिंग जिल्हा, थाना खोंगजाम, याथिबी लौकोल येथील मदत शिबिरात उघडण्यात आली आहेत. आयडीपीएससाठी सरकारने स्थापन केलेल्या मदत शिबिरांमध्ये हे प्रशिक्षण दिले जात आहे.
विनोद तावडे यांची त्या प्रकरणावरून थेट राहुल गांधी यांना नोटीस; निवडणूक निकालाआधी भाजप अॅक्शन मोडवर
राष्ट्रीय तपास यंत्रणांनी मिळवलेल्या माहितीनुसार, मुलींनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना थेट संस्थेत समाविष्ट केले जात नाही. मणिपूरमधील बिघडलेल्या वातावरणामागे म्यानमारमधून मणिपूरमध्ये होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी हेही एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. म्यानमारमधूनच दोन्ही गटांकडे शस्त्रास्त्रे पोहचवली जात आहेत. ज्यांचा वापर मणिपूरमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी केला जात आहे. गेल्या महिन्यातच, ककचिंग आणि थौबल जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या वेगवेगळ्या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला होता. सुरक्षा दलांनी ग्रेनेड, अनेक रायफल आणि हँडगन जप्त केल्या आहेत.
विशेष म्हणजे ही प्रशिक्षण शिबिरे सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या मदत शिबिरांमध्ये घेतली जात आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींचे वय 15 ते 20 वर्षे आहे. राज्यातील हिंसक कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना तयार केले जात आहे.
Next CM of Maharashtra: सरकार कुणाचही बनो! ‘या’ सहा जणांपैकीच कुणीतरी एकच होणार मुख्यमंत्री
मणिपूरमध्ये जातीय संघर्षाची पहिली घटना 3 मे2023 रोजी उघडकीस आली. तेव्हापासून, कुकी-मेतेई दोन्ही समुदायातील एकूण 240 लोक मरण पावले आहेत आणि हजारो लोक विस्थापित झाले आहेत. राज्यात हिंसाचार सुरूच आहे, परंतु या महिन्याच्या सुरुवातीला जिरीबाममध्ये तीन महिला आणि त्यांच्या तीन मुलांची हत्या झाल्यानंतर गोंधळ वाढला आहे. जिरीबाम घटनेच्या निषेधार्थ लोकांचा संताप उफाळून आला असून आंदोलकांनी अलीकडच्या काही दिवसांत अनेक आमदारांच्या घरांची तोडफोड आणि जाळपोळ केली आहे. जिरीबाममध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याचा आरोपही आहे. त्यामुळे तणावही वाढला आहे.
राज्यातील सध्याच्या परिस्थितीमुळे एनपीपीने भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल. एन बीरेन सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्याशिवाय पाठिंबा देणार नाही, अशी मागणी एनपीपीने केली आहे.