विनोद तावडे यांची त्या प्रकरणावरून थेट राहुल गांधी यांना नोटीस; निवडणूक निकालाआधी भाजप अॅक्शन मोडवर
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर केला होता. हॉटेलमध्ये झालेल्या राड्याची देशभरात चर्चा झाली होती. त्यानंर भाजप आणि विनोद तावडेंवर टीकेची झोड उठली होती. कॉ़ंंग्रेसनेही या मुद्द्यावरून भाजपला घेरलं होतं. त्यावरून आता विनोद तावडे यांनी थेट कॉंंग्रेसचे नेते आणि मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावली आहे.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये पैसे वाटण्यासठी गेले होते. त्यांच्याजवळ ५ कोटी रुपये सापडल्याचा आरोप केला होता. त्यावरून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
कांग्रेस का एक ही काम है झूठ फैलाना!
नालासोपारा वाले झूठे मामले में मैंने कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, राहुल गाँधी और पार्टी प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत को मानहानि का नोटिस भेजा है, क्योंकि उन्होंने इस मामले में झूठ फैलाकर मेरी और भारतीय जनता पार्टी की छवि को नुकसान… pic.twitter.com/ZO75yKSx8m
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 22, 2024
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर निवडणुकीच्या एक दिवस आधी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मतदारांना पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप करण्यात आला होता, जो त्यांनी फेटाळून लावला होता. या प्रकरणात तावडे यांनी आता काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुप्रिया श्रीणेत यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यांच्याकडून माफी मागण्याची मागणी केली आहे.
विनोद तावडे म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत यांनी माझी व आमच्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझ्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी खोटी माहिती पसरवली. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या नेत्याची आणि आमच्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. जाणूनबुजून माझी बदनामी करण्यात आली, म्हणून मी आज त्या सर्व नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जर त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली नाही, तर मी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
भाजप सरचिटणीसांनी काँग्रेस नेत्यांना पाठवलेल्या नोटिसच्या प्रती एक्सवर शेअर करत लिहिलं, “काँग्रेसचे एकच काम म्हणजे खोटं पसरवणं! नालासोपारा येथील खोट्या प्रकरणात मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्ष प्रवक्त्या सुप्रिया श्रीणेत्त यांना बदनामीची नोटीस पाठवली आहे, कारण त्यांनी या प्रकरणात खोटी माहिती पसरवून माझी आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं आहे.”
निवडणूक आयोग आणि पोलिस तपासणीत कथित पाच कोटींची रक्कम सापडली नाही. हे प्रकरण पूर्णपणे काँग्रेसच्या खालच्या दर्जाच्या राजकारणाचा पुरावा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.