Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मोक बॉम्ब संसदेत फोडल्याने अनेक खासदार झाले होते भयभीत; दहशतवादी हल्ला असल्याचेच वाटले सर्वांना

दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून सभागृहात प्रवेश केल्याची घटना घडल्यानंतर संसदेतील परिस्थितीबाबत, तेथे उपस्थित खासदारांनी सांगितले की, संसदेच्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा काही दहशतवादी घुसल्याचे त्यांना वाटले. या तरुणांनी तेथे धूर पसरवला तेव्हा ते बॉम्ब फोडत असल्याचा भास झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 14, 2023 | 12:59 PM
स्मोक बॉम्ब संसदेत फोडल्याने अनेक खासदार झाले होते भयभीत; दहशतवादी हल्ला असल्याचेच वाटले सर्वांना
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून सभागृहात प्रवेश केल्याची घटना घडल्यानंतर संसदेतील परिस्थितीबाबत, तेथे उपस्थित खासदारांनी सांगितले की, संसदेच्या वर्धापनदिनानिमित्त पुन्हा काही दहशतवादी घुसल्याचे त्यांना वाटले. या तरुणांनी तेथे धूर पसरवला तेव्हा ते बॉम्ब फोडत असल्याचा भास झाला. आज वाचणार नाही, असे खासदारांना वाटत होते. त्यामुळे ईश्वराचे स्मरण करायला लागले होते; परंतु धुरानंतर स्फोट न झाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तरुण संसदेत आल्यानंतर दहशतवादी घुसल्याचे वाटत होते. आज कोणीही जिवंत राहणार नाही, असे बसपाचे खासदार मलूक नागर यांनी सांगितले. या तरुणांपैकी एकाला पकडून मारहाण करावी. त्याला अशाप्रकारे पकडले पाहिजे की बॉम्बचा स्फोट झाला तर तो आमच्यासह मरेल, असे विचार मनात आले होते.

समाजवादी पक्षाचे खासदार डिंपल यादव म्हणाल्या की, खासदारांच्या सुरक्षेबाबत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, या सरकारला प्रश्न विचारणे हा गुन्हा आहे. हा आपला शेवटचा दिवस असू शकतो, असे त्यावेळी लोकसभेत उपस्थित सदस्यांना वाटले. याचे कारण म्हणजे सरकारच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे हे तरुण तेथे पोहोचले. त्यांच्याकडे रासायनिक शस्त्रे असते तर खासदार वाचू शकले असते का? तो चिंतेचा विषय आहे, असे ते म्हणाले.

सरकारने उत्तर द्यावे

भाजपा खासदार प्रताप सारंगी म्हणाले की, दहशतवादी पन्नूने धमकी दिली होती. अशा स्थितीत दहशतवादी संसदेत घुसल्याचे त्यांना वाटले. येथे ते बॉम्बस्फोट करणार आणि त्यानंतर एकही सदस्य वाचणार नाही. हा नक्कीच दहशतवादी हल्ला आहे. संसदेवरील हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण होत असताना संसदेत दहशतवादी घुसल्याचे सर्वांना वाटत होते, असे काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सांगितले. हा आपला शेवटचा दिवस असल्याचे सर्व खासदारांना वाटले.

Web Title: Many mps were scared after the smoke bomb burst in the parliament nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2023 | 12:59 PM

Topics:  

  • Indian Parliament
  • New Delhi

संबंधित बातम्या

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन,  तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर
1

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर

Teachers News: खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर
2

Teachers News: खुशखबर! महाराष्ट्रातील ‘या’ चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

Parliament Security Breach: ‘लोकशाही’च्या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर? इसम आला, भिंतीवरून उडी मारली अन्…
3

Parliament Security Breach: ‘लोकशाही’च्या मंदिराची सुरक्षा वाऱ्यावर? इसम आला, भिंतीवरून उडी मारली अन्…

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
4

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.