नवी दिल्ली : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या सोहळ्याला अनेकांची विशेष उपस्थिती असणार आहे. केवळ देशातूनच नाहीतर परदेशातूनही नागरिक येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात आता देशातील अनेक राज्य सरकारांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील शैक्षणिक संस्था बंद राहतील, अशी माहिती दिली आहे. याशिवाय त्या दिवशी राज्यभरात दारूची दुकाने बंद राहणार आहेत. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 22 जानेवारीला शाळांना सुट्टी म्हणून घोषित केले आहे आणि लोकांना हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्यास प्रोत्साहित केले आहे. या राज्यातही दारू विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरातील ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या प्रकाशात गोवा सरकारने 22 जानेवारी रोजी सरकारी कर्मचारी आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अयोध्येतील राम मंदिरात नवीन मूर्तीचा अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी छत्तीसगड सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी म्हणून घोषित केला आहे.
तसेच हरियाणा सरकारनेही राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच, अभिषेक सोहळ्याच्या दिवशी राज्यात कुठेही मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.