हरियाणात एका शोरूमला भीषण आग; आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
गुरुग्राम : हरियाणातील गुरुग्राम येथील एका शोरूममध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. व्हिडिओमध्ये आगीच्या ज्वाळा वाढत असल्याचे आणि अग्निशमन दलाचे पथके ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
गुरुग्राममधील दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आल्या. याव्यतिरिक्त, सर्व अग्निशमन केंद्रांना सज्ज ठेवण्यात आले होते आणि अतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. अग्निशमन दलाची टीम आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
#WATCH | Haryana: A massive fire broke out at a showroom in Gurugram, efforts underway to douse the fire. pic.twitter.com/YAuvk1EPfe — ANI (@ANI) October 20, 2025
दरम्यान, मंगळवारी पहाटे दिवाळीच्या उत्सवादरम्यानच गुरुग्राममधील एका शोरूममध्ये ही भीषण आग लागली. दुकान मालकाने याबाबत सांगितले की, मध्यरात्री २:३० च्या सुमारास आगीबद्दल फोन आला. सुरुवातीला त्यांना वाटले होते की नुकसान कमी असेल. मात्र, घटनास्थळी गेल्यावर या आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसून आले. लाकडी साहित्यामुळे आणि काचेच्या तुटण्यामुळे आग वेगाने पसरली होती.
अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. दुसऱ्या एका घटनेत, सोमवारी हरियाणातील अंबाला येथे टायर आणि रिसायकलिंग मटेरियलच्या गोदामात भीषण आग लागली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
आगीच्या घटना वाढताहेत
दिवाळीदरम्यान सकाळी साडेअकरापर्यंत दिल्ली अग्निशमन सेवेला आगीच्या घटनांबद्दल १७० हून अधिक कॉल आले. दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सातत्याने फोन येत आगीच्या घटनांची संख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊनला भीषण आग
दुसऱ्या एका घटनेत, हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या जे. के. सेल्स या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री केंद्राच्या गोडाऊनला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. वायरचे शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या या आगीत अंदाजे दोन कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ऐन दिवाळीत या घटनेमुळे व्यावसायिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळलं आहे.
हेदेखील वाचा : कदमवाकवस्ती येथील गोडाऊनला भीषण आग; तब्बल 2 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक