मेरठ : ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर देशात पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यात आता उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील शास्त्रीनगरमध्ये एका घरात तरुण-तरूणी आल्याने गोंधळ झाला. यात मुस्लिम तरुणाच्या खोलीत हिंदू तरुणी सापडली. याबाबत संशय आल्याने मोठा राडा झाला. याची माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्त्वादी संघटनेचे पदाधिकारीही पोहोचले.
उत्तर प्रदेशातील गढमुक्तेश्वर येथील रहिवासी असलेली 16 वर्षीय हिंदू तरुणी मेरठमधील एका संस्थेत शिक्षण घेत आहे. तर तिच्या परिचयाचा एक मुस्लिम तरूणही त्याच संस्थेत शिक्षण घेत आहे. ते नेहमीप्रमाणे रविवारीही दोघेही मेरठला आले होते. दोघे शास्त्रीनगर सेक्टर-8 येथील घरी पोहोचले. हे घर त्या मुस्लिम तरुणाच्या काकाचे आहे. हिंदू तरूणी ही मुस्लिम तरुणाच्या खोलीत दिसल्याने तेथील उपस्थित लोकांनी चांगलाच गोंधळ घातला.
दुसरीकडे हिंदू जागरण मंचचे पदाधिकारीही पोहोचले. घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या तरुणाला नाव विचारले असता तो मुस्लिम असल्याचे निष्पन्न झाले. यावरून वाद आणखी वाढला. एक हिंदू मुलगी मुस्लिम तरुणाच्या खोलीत आढळल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. यानंतर पोलिसांनी या मुस्लिम तरूणाला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर दोघांच्या पालकांना बोलावून या मुलांना त्यांच्याकडे देण्यात आले.