आपल्या चार मुलांना घेऊन भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरची सर्वदूर चर्चा आहे. पब्जीच्या माध्यामातून भेटलेल्या प्रियकरासाठी या महिलेने अनेक अडथडे पार करत भारत गाठलं. आता यापासून प्रेरणा घेत उत्तरप्रदेशमधील एका तरुणीने आपल्या प्रियकरासाठी जाती धर्माचं बंधना तोडत त्याच्याशी लग्नगाठ बांधली. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या.
[read_also content=”वंदे भारत एक्सप्रेसच्या अडचणी काही संपेना! भोपाळ-दिल्ली ट्रेनला आग, सर्व प्रवासी सुखरूप https://www.navarashtra.com/india/fire-at-bhopal-delhi-vande-bharat-express-at-vidisha-nrps-432608.html”]
उत्तरप्रदेशच्या रामपूरमधील मुस्लिम मुलगी शाहिस्ताची ही अनोखी लवस्टोरी (Shahista Ram Lovestoty)आहे. अझीम नगरमधील भोट बक्कल गावात राहणाऱ्या शाईस्ताच्या वडिलांची प्रकृती काही महिन्यांपूर्वीच बिघडली होती. आपल्या वडिलांवर उपचार करण्यासाठी मुलगी दिल्लीतील रुग्णालयात आली असताना तिथे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या राम नावाच्या हिंदू युवकासोबत तिची भेट झाली. त्यांच्या भेटीच रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणभाका घेतल्या. आणि त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर शाहिस्ताचा सिमा झाली.
यावर कुटुंबीयांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. त्यावर पोलिसांनी दोघांनाही शोधून पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्याचे अध्यक्ष विजेंद्रसिंग तल्यान यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा जबाब घेण्यात आला आहे. तिने स्पष्टपणे सांगितले आहे की ती प्रौढ आहे आणि तिला पाहिजे त्यासोबत राहू शकते. रामावतार पती आहे, म्हणून मी त्याच्याबरोबर जाईन. असे शाहिस्ताने पोलिसांना सांगितले.
त्यानंतर अजीम नगर पोलिसांनी शाइस्ता उर्फ सीमा हिला न्यायालयात हजर केले. न्यायालयातही त्यांनी हेच म्हणणे मांडले. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला की, मुलगी प्रौढ असून तिला तिच्या पतीसोबत जायचे आहे. तिला जाऊ द्या आणि तिला सुरक्षितपणे तिच्या पतीच्या घरी नेले पाहिजे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी मुलीला तिच्या सासरच्या घरी सोडले.