Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ जाहीर!

महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित 'सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४' मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला 'स्थानिक स्वराज्य संस्था' श्रेणीत देशात प्रथम क्रमांक प्रदान करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 18, 2025 | 07:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला
  • शहर अभियंता अरविंद शिंदे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित
  • डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन
भारत सरकारचे जलशक्ती मंत्रालय आयोजित ‘सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024’ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेस देशात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी स्वीकारला. (National Water Award) 

ISRO Chandrayaan Mission-4: इस्रो २०२८ साली करणार प्रक्षेपण; केंद्र सरकारची चांद्रयान मिशन-४ला मंजूरी

या विशेष समारंभात व्यासपीठावर केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. सी.आर. पाटील, राज्यमंत्री ना. व्ही. सोमन्ना, राज्यमंत्री ना. डॉ. राजभूषण चौधरी, सचिव व्ही.एल. कंथाराव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, नवी मुंबई महानगरपालिकेचे अति. शहर अभियंता अरविंद शिंदे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेने नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्थापन आणि पाण्याचा पुनर्वापर यांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सर्वंकष विचार करून देशातील अग्रगण्य स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून हा प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी मुंबई शहराचा राष्ट्रीय पातळीवर झालेला हा गौरव शहराची मान उंचावणारा असून, त्याबद्दल आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण 

तसेच, या यशात नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगत, आयुक्तांनी सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत. यापुढील काळात महानगरपालिका शहर विकासाला सुसंगत धोरणात्मक वाटचाल करेल आणि भविष्यातील पिढ्यांचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यावर भर देईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: National water award announced for navi mumbai municipal corporation commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 07:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.