Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Assembly Elections 2025: NDA की UPA? बिहारमध्ये आता निवडणुका झाल्यास कोणाला सत्ता येणार?

ओपिनियन पोलनुसार त्यांना केवळ १० जागा मिळण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या. या वेळेस पक्ष ८ जागांवर आघाडीवर असून, केवळ २ जागांवर आघाडी असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 31, 2025 | 12:17 PM
Bihar Assembly Elections 2025:

Bihar Assembly Elections 2025:

Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचे सर्वेक्षण
  • भाजपच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज
  • महाआघाडीला मर्यादित यश, काँग्रेस आणि इतर पक्षांची कामगिरी कमकुवत
Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव मतदार अधिकार यात्रा काढत आहे. बिहारमध्ये सुरू असलेलेल्या विशेष सघन पुर्नपडताळणी आणि सुधारणा या प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात आहे, या प्रक्रियेविरोधात आणि निवडणूक आयोगावर करण्यात आलेल्या मतचोरीच्या आरोपांबाबत जनजागृती करण्यासाठी काँग्रेस आणि आरजेडी ही यात्रा काढत आहे. या वरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात टाईम्स नाऊ-जेव्हीसीने केलेल्या जनमत सर्वेक्षणानुसार, २४३ सदस्यीय विधानसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या स्थितीत आहे. सर्वेक्षणानुसार, एनडीएला १३६ जागा मिळू शकतात, तर राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेतृत्वाखालील महागठबंधन ७५ जागांवर मर्यादित राहण्याची शक्यता आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा १२२ इतका आहे.

Maratha Reservation : मुंबईत मराठा आंदोलकांनी ठोकला तळ; राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर जरांगे पाटलांचे सडेतोड उत्तर

एनडीएमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या जागांमध्ये वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०२० च्या निवडणुकीत ७४ जागा जिंकलेल्या भाजपला यंदा ८१ जागा मिळू शकतात, असे सर्वेक्षण सांगते. याशिवाय, भाजप १७ जागांवर आघाडीवर असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाची कामगिरी घसरल्याचे चित्र दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, जेडीयूला २९ जागांवर विजय मिळवता येईल, तर केवळ २ जागांवर आघाडी असल्यामुळे एकूण जागांची संख्या ३१ वर मर्यादित राहण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये जेडीयूने ४३ जागांवर विजय मिळवला होता. यंदा हा आकडा मोठ्या प्रमाणात घटल्यास नितीश कुमार यांची राजकीय ताकद कमी होऊ शकते, असे निरीक्षण व्यक्त होत आहे.

महाआघाडीला मर्यादित यश;  काँग्रेस आणि इतर पक्षांची कामगिरी कमकुवत

दुसऱ्या बाजूला, महाआघाडीच्या गोटातून राजदला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाला (राजद) ५२ जागा मिळू शकतात. सध्या राजद ३७ जागांवर विजयी होऊ शकतो, तर १५ जागांवर आघाडीवर असल्याचे सर्वेक्षण सूचित करते. २०२० च्या निवडणुकीत राजदने ७५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले होते, मात्र यंदा त्यांची कामगिरी घसरणार असल्याचे संकेत आहेत.

SCO परिषदेत पुतिन भेटीपूर्वी मोदींचा झेलेन्स्कींशी संवाद; युक्रेन संघर्ष थांबवण्यावर भारताच्या पाठिंब्याचा केला

काँग्रेस पक्षाच्या बाबतीत, ओपिनियन पोलनुसार त्यांना केवळ १० जागा मिळण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये काँग्रेसने १९ जागा जिंकल्या होत्या. या वेळेस पक्ष ८ जागांवर आघाडीवर असून, केवळ २ जागांवर आघाडी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, महाआघाडीत समाविष्ट असलेल्या इतर छोट्या पक्षांना एकत्रितपणे १३ जागा मिळू शकतात. इतर पक्षांबाबत बोलायचे झाल्यास, प्रशांत किशोर यांच्या ‘जन सूरज’ पक्षाला २ जागा, एआयएमआयएमला (AIMIM) ३ जागा, तर बहुजन समाज पक्षाला (BSP) १ जागा मिळण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, राज्यातील २६ जागांवर तिरंगी आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

सीमांचलमध्ये काट्याची टक्कर

सीमांचल प्रदेशातील २४ जागांपैकी एनडीए आणि महाआघाडी यांना प्रत्येकी १०-१० जागा मिळू शकतात, तर AIMIM ला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एका जागेवर चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवली आहे. मुस्लिम बहुल असलेल्या या भागात महाआघाडीला अधिक जागा मिळण्याची अपेक्षा होती, मात्र सर्वेक्षणानुसार तितकं यश मिळेल असे दिसत नाही.

 

 

Web Title: Nda or upa if elections are held now who will get the most seats whose government will be formed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • bihar assembly elections 2025
  • NDA

संबंधित बातम्या

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!
1

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?
2

Bihar Election Result 2025 : नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री होणार! महिला रोजगार योजनेमुळे बिहारमध्ये वारं फिरलं?

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर
3

Bihar Election Result 2025 : बिहार निवडणुकीत NDA 190 ने आघाडीवर; तर रितेश पांडे, तेजप्रताप, तेजस्वी आणि खेसारी लाल यादव पिछाडीवर

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!
4

Bihar Election Result 2025 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइटमध्ये तांत्रिक बिघाड, आघाडीवरील उमेदवार ‘पराभूत’ म्हणून घोषित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.