Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींपेक्षा त्यांच्या पत्नी श्रीमंत; जाणून घ्या त्यांच्याकडे किती आहे संपत्ती

तेलंगणाच्या राजकारणात मोठा बदल झाल्यानंतर आता बीआरएस सत्तेतून बाहेर पडत, कॉंग्रेसने तेथे सत्ता स्थापन केली आहे. कॉंग्रेसचे प्रभावी उमेदवार रेवंथ रेड्डी यांनी मोठा विजय प्राप्त करीत मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार आहेत. तेलंगणाच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज तिथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Dec 07, 2023 | 05:12 PM
तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींपेक्षा त्यांच्या पत्नी श्रीमंत; जाणून घ्या त्यांच्याकडे किती आहे संपत्ती
Follow Us
Close
Follow Us:

Telangana News : तेलंगणाच्या राजकारणात (Telangana Politicis) आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज तिथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. ABVP मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची (Chief Minister Revanth Reddy) शपथ घेतली आहे. RSS मध्ये आल्यानंतर ते भाजपशीही जोडले गेले होते. पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशातच रेवंत रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून वेगळी माहिती समोर आली आहे. यामधील माहितीवरून रेवंत रेड्डी यांच्यापेक्षी त्यांच्या पत्नी श्रीमंत आहेत.

रेवंत रेड्डी यांच्यापेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत आहे. रेवंत रेड्डी यांचे प्रतिज्ञापत्रात याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. रेवंत रेड्डी त्यांच्या पत्नीच्या तुलनेत किती गरीब आहेत? याबाबतची माहिती पाहुयात.

रेवंत रेड्डी यांच्या पत्नीकडे जंगम मालमत्ता किती?
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, रेवंत रेड्डी आणि त्यांच्या पत्नीकडे 5,17,21,350 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 5,50,000 रुपये HUF रक्कम देखील समाविष्ट आहे. एकूण स्थावर मालमत्तेमध्ये रेवंत यांचा हिस्सा 2.19 कोटी रुपये आहे. तर त्यांची पत्नी गीता यांचा वाटा हा 2.92 कोटी रुपये आहे. याचा अर्थ जंगम मालमत्तेवर रेवंत रेड्डी नाही तर त्यांच्या पत्नीचे वर्चस्व आहे. ज्याअंतर्गत त्यांनी एलआयसीसह रिअल इस्टेट फर्ममध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांची पत्नी गीता यांच्याकडे 83.36 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तर त्यांच्याकडील चांदीची किंमत 7.17 लाख रुपये आहे. तर रेवंत रेड्डी यांनी कोणत्याही सरकारी किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही. रेवंत रेड्डी यांच्याकडे होंडा सिटी आणि मर्सिडीज बेंझ या कार आहेत. त्यांच्याकडे एक पिस्तूलही आहे, ज्याची किंमत दोन लाख रुपये आहे.

दोघांच्याही नावावर 7.77 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची शेतजमीन
रेवंत रेड्डी आणि त्यांची पत्नी गीता यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता आहे. व्यवसायाने शेतकरी असलेले रेवंत रेड्डी आणि त्यांच्या पत्नी गीता यांच्या नावावर 7.77 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची शेतजमीन आहे. त्यापैकी 1.07 कोटी रुपयांची जमीन HUF मार्फत प्राप्त झाली आहे. त्यांची पत्नी गीता यांच्याकडे सुमारे 1 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. 10 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची जमीन रेवंत रेड्डी यांच्याकडे आहे. बिगरशेती जमिनीबद्दल बोलायचे झाले तर इथे पत्नी गीता रेवंत रेड्डी यांना मागे टाकताना दिसते. एकूण 4.82 कोटी रुपयांच्या शेतजमिनीपैकी गीता यांच्याकडे 4.25 कोटी रुपयांच्या दोन जमिनी आहेत. तर रेवंत रेड्डी यांच्याकडे 53 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची जमीन आहे. निवासी मालमत्तेच्या बाबतीतही गीता रेवंतपेक्षा वरचढ आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, गीता यांच्याकडे दोन निवासी मालमत्ता आहेत. ज्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. तर रेवंत रेड्डी यांच्याकडेही दोन मालमत्ता आहेत, ज्यांची किंमत 2.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Web Title: New telangana cm revanth reddys wife richer find out how much wealth they have nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2023 | 05:12 PM

Topics:  

  • Congress government
  • Revanth Reddy

संबंधित बातम्या

50 years of Emergency: आणीबाणीची ५० वर्षे; आजच्याच दिवशी झाली होती आणीबाणीची घोषणा; कसा होता स्वतंत्र भारताचा काळा इतिहास
1

50 years of Emergency: आणीबाणीची ५० वर्षे; आजच्याच दिवशी झाली होती आणीबाणीची घोषणा; कसा होता स्वतंत्र भारताचा काळा इतिहास

रेवंत रेड्डी यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास; एबीव्हीपीपासून सुरु होत आता काँग्रेसपर्यंत
2

रेवंत रेड्डी यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास; एबीव्हीपीपासून सुरु होत आता काँग्रेसपर्यंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.