NIA RAID (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
देशविरोधी कारवायांवर जोरदार कारवाई करत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) एका मोठ्या हेरगिरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवणाऱ्या एका रॅकेटचा माग काढत NIA ने पाच राज्यांतील 15 ठिकाणी धडक छापेमारी केली आहे. दिल्ली, मुंबई, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आसाम आणि पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
काळजी घ्या ! देशभरात कोरोनाचा वाढतोय धोका; गेल्या 24 तासांत 7 जणांचा मृत्यू तर रुग्णसंख्या पोहोचली…
ही छापेमारी PIO (Persons of Indian Origin) शी संबंधित संशयित व्यक्तींच्या ठिकाणी झाली असून, छाप्यांदरम्यान एनआयएने मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य, आर्थिक व्यवहार दर्शवणारी संवेदनशील कागदपत्रं आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानमधून चालवले जात असलेले हेरगिरीचे जाळे
एनआयएच्या माहितीनुसार, या छाप्यांचा उद्देश भारतात पाकिस्तानी एजंटांच्या नेटवर्कला उघड करणे होता. या प्रकरणी संशयित व्यक्ती पाकिस्तानातील एजंटांच्या संपर्कात होत्या. त्यांनी भारतातील महत्त्वाची माहिती त्यांच्याशी शेअर केली होती, याबदल्यात त्यांना आर्थिक मोबदला दिला जात होता.
2023 पासून पीआयओंसोबत संवेदनशील माहिती शेअर करणाऱ्या व्यक्तींवर एनआयए लक्ष ठेवून होती. याच पार्श्वभूमीवर, 20 मे 2025 रोजी एनआयएने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
अटक: CRPF जवान आणि युट्यूबर
या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. पहिल्या अटकेत ज्योती मल्होत्रा नावाच्या युट्यूबरला गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. ती पाकिस्तानातील युट्यूबर झिशान हुसैनशी संपर्कात होती. झिशानसोबत मिळून ती सोशल मीडियावर पाकिस्तानची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करत होती, असा ठपका तिच्यावर आहे. तसेच, ती दोन महिन्यांपूर्वी धार्मिक व्हिसावर पाकिस्तानला गेली होती, याचे पुरावेही समोर आले आहेत.
दुसरी धक्कादायक अटक दिल्लीमध्ये CRPF च्या जवान मोती राम जाट याला करण्यात आली आहे. त्याच्यावर पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप आहे. तो ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत होता आणि त्याला त्यासाठी पैसे दिले जात होते.
कायद्यानुसार गुन्हे नोंद
या प्रकरणी NIA ने भारताचे नवीन फौजदारी कायदे (BNS 2023) अंतर्गत कलम 61(2), 147, 148, तसेच अधिकृत गुपिते कायदा 1923 चे कलम 3 आणि 5, आणि यूए(पी) कायदा 1967 च्या कलम 18 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी उडवली पाकिस्तानची झोप; म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर…”