नवी दिल्ली : आज देशात राष्ट्रपतीपदाची निवडणूक (Presidential election 2022) झाली, ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. देशातील 15 व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. (Voting today for the 15th presidential election) मात्र या निवडणुकीतही क्रॉस व्होटिंगची (Cross Voting) घटना समोर आली आहे. देशातील अनेक भागात क्रॉस व्होटिंग झाल्याचे धक्कादायक समोर आले आहे, त्यामुळं क्रॉस व्होटिंग कोणी केलं यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. (debated in political circles)
[read_also content=”शिंदे गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करु शकतो? संजय राऊत यांचा सवाल https://www.navarashtra.com/india/how-can-the-shinde-group-dismiss-the-executive-of-the-shivsena-question-by-sanjay-raut-305599.html”]
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या बरेली मतदारसंघाचे शाहजील इस्लाम आमदार आहेत. (MLA Shahjil islam) शाहजील इस्लाम यांनी योगी (Yogi) यांच्यावर वक्तव्य केले होते, त्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्या विविध मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. यूपी, गुजरात, ओडिशा ते आसामपर्यंत क्रॉस व्होटिंग पाहायला मिळाले. (Cross voting from UP, Gujarat, Odisha to Assam) तर दुसरीकडे गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि ओडिशा, आसाममध्ये काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंगचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील सपा आमदार शाहजील इस्लाम यांनी द्रौपदी मुर्मू यांना जाहीर मतदान केले.