Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor : कराचीवर हल्ल्यासाठी सज्ज होती भारतीय नौसेना, पाकिस्तानच्या नौसेनेचा निभाव लागला असता का? वाचा सविस्तर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अत्यंत रणनीतीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले

  • By संदीप गावडे
Updated On: May 15, 2025 | 12:05 AM
ऑपरेशन सिंदूर: कराचीवर हल्ल्यासाठी सज्ज होती भारतीय नौसेना, पाकिस्तानची नौसेना भारतापुढे ठरते फिक्की

ऑपरेशन सिंदूर: कराचीवर हल्ल्यासाठी सज्ज होती भारतीय नौसेना, पाकिस्तानची नौसेना भारतापुढे ठरते फिक्की

Follow Us
Close
Follow Us:

नवीन दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अत्यंत रणनीतीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईने हादरलेल्या पाकिस्तानने भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराच्या जल, थल आणि वायु दलांनी मिळून प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला.

पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले

ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या भारत-पाक संघर्षादरम्यान भारतीय नौसेनेने अरबी समुद्रात केलेली भव्य तैनाती पाकिस्तानसाठी भयावह ठरली. भारतीय नौसेनेच्या उपस्थितीनेच पाकिस्तानमध्ये इतका दबाव निर्माण केला की त्यांना स्वतःहून शस्त्रसंधीची विनंती करावी लागली. वाइस अ‍ॅडमिरल ए. एन. प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, “जर पाकिस्तानने पुन्हा काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना माहिती होती की भारत काय करू शकतो. आम्ही केवळ एका ‘हो’च्या प्रतीक्षेत होतो. संपूर्ण तयारी झाली होती.”

कराचीवर हल्ल्यासाठी नौसेना होती सज्ज

वाइस अ‍ॅडमिरल प्रमोद यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ९६ तासांत भारतीय नौसेना संपूर्ण तयारीत होती. नौसेना कराचीसह इतर ठिकाणांवर तातडीने हल्ला करण्यास सक्षम होती. २४ एप्रिल रोजी नौसेनेने अरबी समुद्रात रिअल टाइम सिच्युएशनमध्ये सरफेस-टू-एअर मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले. यामुळे नौसेनेकडे मल्टी लेयर एअर डिफेन्स सिस्टम असल्याचे स्पष्ट झाले.

युद्धासाठी पूर्ण तयारीत होती भारतीय नौसेना

भारतीय नौसेनेचा कॅरियर बॅटल ग्रुप १०० ते २०० किलोमीटरपर्यंत क्षेत्रावर वर्चस्व प्रस्थापित करतो. यामध्ये विमानवाहू नौका, डिस्ट्रॉयर, फ्रिगेट्स, P-8I पाताळमाऱ्या शोधणारी विमाने, पाणबुडी, MiG-29K लढाऊ विमाने तैनात होती. २६ एप्रिलला नौसेनेने ब्रह्मोस मिसाईलसह अनेक मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले. या चाचण्यांनी भारताच्या ऑपरेशनल क्षमतेचा प्रभाव दाखवून दिला. सर्व युद्धनौका, त्यांचे सेन्सर, डेटा लिंक, कम्युनिकेशन सिस्टम एकमेकांशी जोडले गेले होते. नौसेना एक कॉम्पोझिट युनिट बनली होती. पाणबुड्यांमध्ये टॉरपीडो, युद्धनौकांवर बराक मिसाईल, तसेच बंदरे उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेली शस्त्रे सज्ज होती.भारतीय नौसेना ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी नौसेना आहे. तर पाकिस्तानची नौसेना भारताच्या वेस्टर्न फ्लीटच्याही समोर उभी राहू शकत नाही.

पाकिस्तानची नौसेना बंदराबाहेरही पडली नाही

भारतीय नौसेनेच्या आक्रमक तयारीमुळे पाकिस्तानी नौसेना आपली जहाजं बंदरातच ठेवण्यास भाग पडली. त्यांना सतत भीती वाटत होती की भारतीय नौसेनेचा अचानक हल्ला झाल्यास त्यांचे संरक्षण कोण करणार? पाकिस्तानची हवाई ताकद आधीच भारतीय वायूदलाने निष्प्रभ केली होती, अशा परिस्थितीत त्यांची नौसेना काहीही करू शकली नाही. नौसेनेच्या एका अधिकाऱ्याच्या मते, “जर युद्ध झाले असते, तर केवळ युद्धनौकाच नव्हे, तर कराचीसारखे बंदरही उद्ध्वस्त झाले असते.” ऑपरेशन सिंदूरने पुन्हा एकदा सिद्ध केले की भारताची जल, थल आणि वायुदल यांची एकत्रित तयारी आणि क्रियाशीलता अत्यंत प्रभावी आहे. पाकिस्तानसारख्या देशासमोर भारतीय नौसेनेचा दरारा स्पष्टपणे दिसून आला आणि भारताने आपल्या सामर्थ्याने जागतिक पातळीवर आपली प्रतिष्ठा अजून भक्कम केली.

Web Title: Operation sindoor indian navy ready to attack on karachi during india pak tensions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 11:57 PM

Topics:  

  • Indian Navy
  • Karachi
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
1

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

India-South Korea : $150 अब्ज ऊर्जा आयातीसाठी भारत सज्ज; कोरिया देणार आधुनिक तंत्रज्ञानाची अमूल्य साथ
2

India-South Korea : $150 अब्ज ऊर्जा आयातीसाठी भारत सज्ज; कोरिया देणार आधुनिक तंत्रज्ञानाची अमूल्य साथ

Indian Navy : भारतीय नौदल किती आहे सक्षम? शेजारील देशांच्या तुलनेत तयारी किती?
3

Indian Navy : भारतीय नौदल किती आहे सक्षम? शेजारील देशांच्या तुलनेत तयारी किती?

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
4

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.