Patanjali Acharya Balkrishna included in the list of top 20 scientists in the world by Stanford University
Acharya Balakrishna in Top 20 : नवी दिल्ली : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगातील टॉप 20 शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय व्यक्तीचा देखील समावेश आहे. हरिद्वार येथील पतंजली योग पीठ ट्रस्टचे आचार्य बालकृष्ण यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत आचार्य बालकृष्ण यांचा समावेश होण्याची ही दुसरी वेळ आहे. आचार्य बालकृष्ण यांनी योग आणि आयुर्वेदावर १२० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आचार्य बालकृष्ण यांच्याकडे या संदर्भात अनेक पदवी आहेत.
गुरुकुल आणि संस्कृत शाळांमध्ये शिक्षण
आचार्य बालकृष्ण हे आयुर्वेद केंद्र, पतंजली योगपीठचे अध्यक्ष आहेत. ते मूळचे हरिद्वारचे आहेत. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गुरुकुलमध्ये घेतले, त्यानंतर त्यांनी संस्कृत आणि आयुर्वेदाचे उच्च शिक्षण घेतले. त्यांनी नेपाळमधील आयुर्वेदिक महाविद्यालयातही शिक्षण घेतले आणि आयुर्वेदात विशेष पदवी मिळवली. त्यांनी वाराणसीतील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून हायस्कूल आणि पदवी पूर्ण केल्याचे सांगितले जाते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आचार्य बालकृष्ण यांचा जगभरातील सर्वोच्च शास्त्रज्ञांमध्ये समावेश झाल्यानंतर रामदेव बाबा यांनी मत व्यक्त केले आहे. यावेळी योगगुरु स्वामी रामदेव म्हणाले की, आचार्य बालकृष्ण यांनी केवळ आयुर्वेदाला वैज्ञानिक मान्यता दिली नाही तर जगभरातील शास्त्रज्ञांसाठी निसर्गोपचारात संशोधनाचे नवे मार्गही उघडले आहेत. जगातील अव्वल शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होणे हे नैसर्गिक औषधी वनस्पती आणि पारंपारिक आयुर्वेदिक ज्ञानात लपलेल्या अफाट क्षमतेचे प्रतिबिंब आहे भारताच्या संशोधन क्षमता आणि जागतिक नेतृत्वाला उजाळा देण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे, अशा शब्दांत योगगुरु बाबा रामदेव यांनी आचार्य बालकृष्ण यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पतंजलीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अनुराग वार्ष्णेय यांनी आचार्य बालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. आधुनिक वैज्ञानिक तंत्रांद्वारे जगभरात आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी आचार्य बाळकृष्ण यांच्या संशोधन आणि समर्पणाबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला.आचार्य बाळकृष्ण यांचे प्रेरणादायी योगदान आपल्याला आपल्या कालातीत आयुर्वेदिक ज्ञानाची आधुनिक विज्ञानाशी सांगड घालून निरोगी, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याची प्रेरणा देते असेही पुढे म्हणाले.