दुसऱ्याच्या मनातील प्रश्न अचूक ओळखून त्यावर समाधान सांगणारे बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) सध्या काही ना काही कारणामुळे सगळीकडे चर्चेचा विषय ठरतच आहे. त्यांच्या कार्यकर्मावरुन होणारे वाद काही नवीन नाही. मात्र, आता हे बागेश्वर महाराज (Bageshwar Maharaj) वेगळ्याच गोष्टीवरुन चर्चेत आले आहे. सीट बेल्ट न लावता गाडी चालवल्याबद्दल पाटणाच्या वाहतूक पोलिसांनी बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांच्यावर कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी कारच्या मालकाला एक हजार रुपयांचे चलान पाठवले आहे.
[read_also content=”Twitte चं नव फिचर! आता दोन तासांचा व्हिडीओ अपलोड करता येणार, पण फक्त ब्लू टिक सब्स्क्रायबर्सना https://www.navarashtra.com/world/elon-musk-announces-new-feature-for-twitter-blue-users-to-upload-two-hours-video-nrps-401453.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, बागेश्वर बाबा कार्यक्रमानिमित्त पाटण्यात आले होते. 13 मे रोजी पाटण्यात बागेश्वर बाबांचे आगमन होताच मनोज तिवारीने यांनी त्यांना त्याच कारमध्ये बसवून विमानतळावरून आणले. दोघांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यांची हे वाहन मध्य प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दोघांनी वाहतुकीच्या नियमांच उल्लंघन केल्याने पाटणा पोलिसांनी वाहतूक नियमांचा हवाला देत कारवाई केली.
विशेष म्हणजे 11 फेब्रुवारीलाही या वाहनाचे दोन हजार रुपयांचे चलन कापण्यात आले आहे. आजपर्यंत ते सादर करण्यात आलेले नाही. पाटणा वाहतूक पोलिसांनी तपास केला असता ते प्रलंबित दाखवत होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील झाशी येथे हे चलन जारी करण्यात आले होते.
बागेश्वर बाबांचे आणि मनोज तिवारी यांचा फोटो आणि व्हिडिओ समोर येताच पाटणाच्या वाहतूक पोलिसांनी व्हिडिओ आणि फोटो तपासला. ज्यामध्ये बागेश्वर बाबा आणि खासदार मनोज तिवारी विमानतळावरून गांधी मैदानाकडे जाताना दिसत आहेत. तसेच, बाबा आणि खासदार मनोज तिवारी यांनी सीट बेल्ट घातला नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशच्या वाहन क्रमांकावर चालान कापण्याचा निर्णय घेतला. पाटणा वाहतूक पोलिसांनी जारी केलेले चालान कोठूनही ऑनलाइन सादर केले जाऊ शकते.