राजस्थान : पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजस्थान सरकारने एक महत्ताचा निर्णय घेतला आहे. दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) आणि उज्ज्वला योजनेत नाव नोंदवलेल्या नागरिकांना 500 रुपयांत एलपीजी सिलिंडर देणार असल्याचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे.
[read_also content=”कर्नाटक काही ऐकेना! महाराष्ट्र सरकारचा विरोध न जुमानता आता अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय https://www.navarashtra.com/maharashtra/the-decision-to-increase-the-height-of-almatti-dam-is-now-in-spite-of-opposition-from-the-maharashtra-government-nrps-354972.html”]
काँग्रेसची भारत जोडो यात्रा राजस्थान मध्ये आली असताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेमध्ये जनसंबोधन करताना सांगितलं की, ‘सध्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु आहे. मी यावेळी जाहीर करतो की दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेशी संबंधित लोकांना आहेत 1 एप्रिलनंतर 500 रुपये किमतीत गॅस सिलेंडर दिले जातील. गरीबांना वर्षभरात 12 सिलेंडर 500 रुपयांमध्ये मिळतील, या सिलेंडर सध्या 1040 रुपयांन उपलब्ध आहेत.’
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषणा करत सांगितलं आहे की, ही नवीन योजना 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येईल. राजस्थानच्या जनतेला महागाईच्या संकटातून बाहेर करण्याचा हा प्रयत्न आहे. यासाठी सरकार नवीन योजना सुरु करणार आहे. या नव्या योजने अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) आणि उज्ज्वला योजनेतील नागरिकांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. या योजनेअंतर्गत वर्षाला 12 सिलेंडर दिले जातील. सरकारचं लक्ष्य गरीब आणि गरजू लोकांना योजनांमध्ये पूर्णपणे सामावून घेऊन त्यांना अधिक लाभ देणे हा आहे.के
देशभरात एलपीजी गॅस सिलेंडर दर वेगवेगळे आहेत. मुंबईत 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर दर 1052.50 रुपये आहे. देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलो घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर, कोलकातामध्ये 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 1079 रुपये तर, चेन्नईमध्ये 14.2 किलो गॅस सिलेडरची किंमत 1068.50 रुपये इतकी आहे.