Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताज महालमधील २२ खोल्या उघडण्याच्या मागणीने धरला जोर, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले खडे बोल

ताज महालमधील (Taj Mahal PIL) २२ खोल्या उघडल्या जाव्यात आणि आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) कडून त्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी (Hearing) झाली.

  • By साधना
Updated On: May 12, 2022 | 04:02 PM
Had his wife not been shown the Taj Mahal, he would be alive today

Had his wife not been shown the Taj Mahal, he would be alive today

Follow Us
Close
Follow Us:

अलाहाबाद : ताजमहालच्या (Taj Mahal)२२ खोल्या उघडण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर (PIL For Opening 22 Rooms Of Taj Mahal) आज अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठासमोर सुनावणी झाली.अलाहाबाद उच्च न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांना चांगलंच सुनावलं. आज तुम्ही ताज महालमधील २२ खोल्या पाहण्यासाठी याचिका दाखल केली आहे. उद्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये जाण्याची परवानगी मागाल असे कोर्टाने म्हटले आहे.

[read_also content=”उरणच्या केगाव समुद्रकिनारी सापडले फ्लेअर्स, स्फोटके असल्याच्या संशयाने खळबळ https://www.navarashtra.com/maharashtra/bomb-like-object-found-near-uran-beach-nrsr-279056.html”]

ताज महालमधील २२ खोल्या उघडल्या जाव्यात आणि आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) कडून त्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. या याचिकेवर न्या. डी. के. उपाध्याय आणि न्या. सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. याचिकार्त्यांच्या वकीलांनी सांगितले की, देशातील नागरिकांना ताज महालबाबत सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. आम्ही. ताज महालमध्ये एखादी वस्तू लपवण्यात आली असेल तर त्याची माहिती नागरिकांना द्यायला हवी. ताज महालची जमीन कोणाची आहे, हा आमचा मुद्दा नसून या बंद खोलीत काय आहे, हे जाणून घ्यायचं असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटले.

उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी बाजू मांडताना म्हटले की, या प्रकरणी आग्रामध्ये आधीच खटला दाखल आहे. त्याशिवाय याचिकाकर्त्याच्या अधिकार क्षेत्रात हा भाग येत नाही.

हायकोर्टाने याचिकाकर्त्याला चांगलेच फटकारले. तुम्ही आधी एमए करा, त्यानंतर नेट परीक्षा उत्तीर्ण करून जेआरएफसाठी पात्र होऊन या विषयावर संशोधन करावे. एखाद्या विद्यापीठाने तुम्हाला संशोधन करण्यापासून रोखल्यास कोर्टात दाद मागावी, असेही खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले. ताज महाल कोणी बनवला याची माहिती तुम्हाला नाही का, ताज महालचे वय काय, ते कोणी बनवले याची माहिती देण्यासाठी आम्ही येथे बसलो आहोत का, असा सवालही हायकोर्टाने केला. जनहित याचिका दाखल करण्याच्या प्रक्रियेला हास्यास्पद करू नका, असेही कोर्टाने म्हटले.

Web Title: Pil filed for opening 22 rooms of taj mahal nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2022 | 04:01 PM

Topics:  

  • Taj Mahal

संबंधित बातम्या

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल! असंख्य खोल्या, राणीचा महल अन् इथे जाण्यासाठी एंट्री फीचीही गरज नाही
1

भारताप्रमाणेच नेपाळमध्येही आहे सुंदर ताजमहाल! असंख्य खोल्या, राणीचा महल अन् इथे जाण्यासाठी एंट्री फीचीही गरज नाही

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
2

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

Taj Mahal Firing : प्रवेश नाकारल्याने भाजप नेत्याचा ताजमहल परिसरात गोळीबार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
3

Taj Mahal Firing : प्रवेश नाकारल्याने भाजप नेत्याचा ताजमहल परिसरात गोळीबार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Dinvishesh: शाहजहानची पत्नी मुमताजचा झाला होता मृत्यू; जाणून घ्या 17 जूनचा इतिहास
4

Dinvishesh: शाहजहानची पत्नी मुमताजचा झाला होता मृत्यू; जाणून घ्या 17 जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.