PM Kisan Yojana 20th Installment Update: देशातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या योजनेचे एकूण १९ हप्ते जारी झाले असून, दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांना ६,००० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.
सध्या असा अंदाज वर्तवला जात आहे की, २०वा हप्ता ९ जुल्यानंतर जारी केला जाऊ शकतो. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परदेश दौरा, जो २ जुलै ते ९ जुलै दरम्यान आहे. नेहमीप्रमाणे, हप्त्यांचे वितरण पंतप्रधानांच्या हस्तेच करण्यात येते. त्यामुळे ते देशात परतल्यानंतरच हा हप्ता जारी होण्याची शक्यता आहे.
Pakistan News: हाफिज सईद आणि मसूद अझहर भारताच्या ताब्यात देण्यास तयार? बिलावल भुट्टोंचे विधान
PM-Kisan योजनेत वर्षभरात तीन हप्ते वितरित केले जातात, प्रत्येकी ₹२,००० रुपये. दर चार महिन्यांनी एक हप्ता जारी होतो. फेब्रुवारी २०२५मध्ये शेवटचा हप्ता (१९ वा) मिळाला होता, त्यानुसार जुलैपर्यंतचा कालावधी पूर्ण झाला असून नवीन हप्ता कधीही जाहीर होऊ शकतो.
कोणत्याही शेतकऱ्याला त्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
जर नोंदणी क्रमांक आठवत नसेल, तर त्याच पेजवर ‘तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या’ हा पर्याय वापरून तो मिळवता येतो.
Dalai Lama : ओलीस ठेवण्याचा कट, राजवाडा पाडण्याची योजना आणि रक्तपात; दलाई लामांना का सोडावं लागलं हो