Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satbara Utara News: ७/१२ आणि नकाशांचा होणार अचूक ताळमेळ; पोटहिस्सा मोजणीचा मोठा निर्णय

राज्यात १८९० ते १९३० या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यानंतर १९९२ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटणीमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 07, 2026 | 04:15 PM
7/12 extracts and maps will now be accurately matched

7/12 extracts and maps will now be accurately matched

Follow Us
Follow Us:
  • शेतजमिनींच्या नकाशा तसेच ७/१२उतारामधील तफावत दूर होणार
  • राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (७/१२) अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
  • सर्वेक्षणासाठी खासगी संस्थांची घेतली जाणार मदत
Satbara Utara News: राज्यातील ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या नकाशा तसेच ७/१२उतारामधील तफावत दूर करण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची मोजणी करून नकाशे आणि अधिकार अभिलेख (७/१२) अद्ययावत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आता जमिनींचे प्रलंबित वाद मिटण्यास मदत तर होईलच शिवाय, प्रत्येक भूखंडाला आता ‘भू-आधार’ क्रमांक (यूएलपीआयएन) मिळणार आहे.

राज्यात १८९० ते १९३० या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यानंतर १९९२ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत खरेदी-विक्री, वारस हक्क किंवा वाटणीमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत. मात्र, या सर्व पोटहिश्शांची प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने सरकारी दप्तरी नकाशे आणि ७/१२ उतारा यांचा ताळमेळ लागत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या स्तरावरून आता ‘पोटहिस्सा मोजणीचा पथदर्शी प्रकल्प’ सुरू करण्यात येत आहे.

‘अजित पवारांच्या अपघातावर त्यांचे नेते संशय घेतायत तर मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ होण्याची काय गरज?’

सर्वेक्षणासाठी खासगी संस्थांची घेतली जाणार मदत

प्रकल्पाच्या सनियंत्रणासाठी राज्य स्तरावर अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तसेच जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समित्या या कामाचा आठवड्याला आढावा घेतील. यामध्ये खासगी सर्वेक्षण संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.

काय आहे ‘भू-आधार’?

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक जमिनीच्या तुकड्याला आता (यूएलपीआयएन) ‘भू-आधार’ क्रमांक दिला जाणार आहे. आधार कार्डाप्रमाणेच जमिनीची सर्व माहिती या एका क्रमांकावर उपलब्ध असेल. यामुळे पीक विमा, बँकांकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे शेतकऱ्यांसाठी अधिक सोपे होणार आहे.

Ratnagiri ZP Election च्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज; तीन हजार पोलिस तैनात

6 शेतक-यांच्या जमिनीचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे, नकाशे आणि ७/१२ यांचा मेळ बसल्यामुळे ग्रामीण, भागातील जमिनीचे अर्थकारण अधिक मजबूत होईल.
चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्री

शेतकऱ्यांना होणारे थेट फायदे

वादातून सुटका जमिनीचे क्षेत्र आणि हद्दी निश्चित झाल्यामुळे शेतक-यांमधील आपसातील वाद कमी होतील.

अचूक नकाशे ७/१२ उताऱ्यााप्रमाणे प्रत्यक्ष जागेचा नकाशा उपलब्ध होईल.

डिजिटल डेटाबेस पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी बँकांकडे अचूक डिजिटल माहिती उपलब्ध असेल.

खरेदी-विक्री सुलभ : जमिनीच्या व्यवहारापूर्वी मोजणीची प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होईल.

 

Web Title: 712 extracts and maps will be accurately matched a major decision has been made regarding sub division measurement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Farmers Issues
  • Farmers News

संबंधित बातम्या

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध
1

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या; वाघोलीत पशुपालकांची बैठक पार
2

Animal Husbandry Committee Satara: पशुधनाचा विमा काढा अन् योजनांचा लाभ घ्या; वाघोलीत पशुपालकांची बैठक पार

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा
3

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित; 6.22 लाख खात्यांमध्ये तब्बल ‘इतके’ कोटी जमा

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती
4

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.