Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Bihar Visit: पंतप्रधान मोदींनाच जीवे मारण्याची धमकी; बिहारमध्ये संशयिताला अटक

सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत भागलपूर येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी विशेष पथक तयार केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 30, 2025 | 10:21 AM
PM Modi Bihar Visit:  पंतप्रधान मोदींनाच जीवे मारण्याची धमकी; बिहारमध्ये संशयिताला अटक
Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. गुरुवारी, २९ मे २०२५ रोजी ते पाटणा येथे पोहोचले आणि त्यांनी शहरात भव्य रोड शो केला. आज, ३० मे रोजी त्यांचा रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथे एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एक व्यक्ती अडचणीत आला आहे. भागलपूरमध्ये या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, गुरुवारी एसएसपी कार्यालयाने याबाबत अधिकृत माहिती दिली. या प्रकारामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खळबळ उडाली असून, प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यादरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर कुमार रंजन असे असून, त्याचे वय सुमारे ३५ वर्षे आहे. भागलपूर येथील एसएसपी कार्यालयाने गुरुवारी (२९ मे २०२५) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान मिळालेल्या धमकीच्या माहितीची गंभीर दखल घेतली गेली.

Vaishnavi Hagawane Case: एमजी हेक्टर दिली तर गाडी पेटवून देईन..; वैष्णवीच्या वडिलांनी थेट पुरावेच दाखवले

सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत भागलपूर येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी विशेष पथक तयार केले. या पथकाने तातडीने तपास सुरू करून आरोपीला अटक केली. या घटनेनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान, तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस पथकाने मंटू चौधरी नावाच्या एका वृद्ध व्यक्तीला ताब्यात घेतले.  प्राथमिक चौकशीनुसार, मंटू चौधरी या वृद्धाने चौकशीत सांगितले की, तो मॅट्रिकही पास झालेला नाही आणि केवळ कीपॅड मोबाईल फोन वापरू शकतो.  संपूर्ण प्रकरणात त्याला अडकवण्याचे काम समीर कुमार रंजन याने केले आहे. याच दरम्यान, तपास यंत्रणांना एक मोबाईल नंबर आढळून आला, जो VPN (व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करून तब्बल ७१ वेळा सक्रिय झाला होता. हा मोबाईल नंबरच संपूर्ण प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो, अशी शक्यता तपास पथकाने व्यक्त केली आहे.

विशेष पोलिस पथकाने सुलतानगंज पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील महेशी गावातून समीर कुमार रंजन (वय ३५) याला अटक केली. या प्रकरणात त्याच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान, समीर कुमार रंजन याने आपली कबुली दिली असून त्याने VPN (व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क) चा वापर करून धमकीचा कॉल केल्याचे मान्य केले आहे.

महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा उघड; मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितली ‘ती’ गोष्ट, म्हणाले…

पोलिसांच्या प्राथमिक तपासात समीर आणि त्याच्या सह-भाडेकरूमधील जमिनीच्या वादाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात वापरलेला मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला असून, त्याच्या फॉरेन्सिक तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण घटनेचा तपास अधिक खोलवर सुरू असून, या प्रकारामागे आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.

 

 

Web Title: Pm modi bihar visit threat to kill prime minister modi suspect arrested in bihar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 10:21 AM

Topics:  

  • Bihar Poliltics
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी
1

‘मन की बात’ खूप आहे सलोनी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणतात जॉर्जिया मेलोनी

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका
3

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?
4

PMO Of India : आता थेट साधता येणार PM मोदींशी संवाद; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.