एमजी हेक्टर दिली तर गाडी पेटवून देईन..; वैष्णवीच्या वडिलांनी थेट पुरावेच दाखवले
Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात काल (२९ मे) पुणे जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत, “आम्ही हुंड्यामध्ये गाडी मागितली नाही,” असा दावा केला. या दाव्यावर प्रतिक्रिया देताना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आणि काही संबंधित पुरावे देखील सादर केले.
पत्रकार परिषदेत बोलातना वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे म्हणाले की, “वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नासाठी आम्ही एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. मात्र ही गाडी बुक केल्यानंतर हगवणे कुटुंबीयांनी आमच्यासोबत वाद सुरू केला. मला एमजी हेक्टर गाडी नकोय मला फॉर्च्यूनरच हवी आहे. एमजी हेक्टर दिली तर मी ती गाडी पेटवून देईन,” अशी धमकी हगवणे कुटुंबियांनी दिली होती. तसेच, “गाडी दिली नाही तर लग्नही मोडू,” अशीही धमकी त्यांनी दिली होती. इतकेच नव्हे तर चांदीच्या ताटांची आणि सोन्याच्या दागिन्यांचीही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती.
IND Vs END : भारतीय ‘अ’ संघाची आता खरी कसोटी, इंग्लंड लायन्स विरुद्ध करणार दोन हात..
हगवणेंचे वकीत पैशांसाठी आणि हुंड्यासाठ छळ केला नाही, गाडी मागितली नाही, असं म्हणत आहेत, त्यांच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, असही त्यांनी म्हटलं आहे. पण लग्नाच्या आधी मी त्यांच्यासाठी एमजी हेक्टर गाडी बुक केली असतानाही त्यांनी आमच्याकडे फॉर्च्युनर गाडीसाठी आग्रह धरला.एमजी हेक्टर गाडीसाठी मी पन्नास हजार रुपये अॅडव्हान्सही भरले होते. एमजी हेक्टर बुक केली म्हणून हगवणे कुटुंबाने माझ्याशी वादावादी केली. एमजी हेक्टर गाडी घेतली तर मी ती सोडून देईन किंवा पेटवून देईन, मला गाडी पाहिजे तर फॉर्च्युनरच पाहिजे. त्यामुळे नाईलाजाने मला लग्नात फॉर्च्युनर गाडीच द्यावी लागली.
हगवणेंकडे एकच गाडी आहे. पाच-दहा गाड्या नाहीत, त्या पाच कोटींच्याही नाहीत. त्यांच्याकडे फक्त एकच गाडी आहे आणि ती फोर्ड गाडी आहे. दुसरी जी ९० लाखांच्या गाडीबद्दल ते बोलत आहेत ती गाडी दुसऱ्या व्यक्तीची आहे. ती गाडी सध्या पोलीस स्टेशनला लावलेली आहे. तुम्ही स्वत: जाऊन तिथे चेक करा, ती कुणाच्या नावावर आहे. हगवणेंकडे कुठलीही गाडी नसून एकच गाडी आहे, तीही मी दिलेली आहे. ती दिली नसून त्यांनी मागितल्याचं अनिल कस्पटेंनी स्पष्ट केलं.
RCB vs PBKS : पंजाब किंग्सची फलंदाजी ढासळली! चंदीगडमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांचा दबदबा! RCB समोर
अनिल कस्पटे म्हणाले, माझ्या मुलीच्या लग्नात केलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर मी लग्नाला उभे राहणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली होती. आधीच त्यांनी माझ्या मुलीची दोन लग्न देखील मोडली होती. त्यामुळे हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. लग्नाला तयार झाल्यानंतरही त्यांनी आमचा मानसिक छळच केला. त्यांनी माझ्याकडे सोन्या-चांदीची मादणी केली. चांदीची भांडी, चांदीच्या ताटाची, चांदीच्या गौराई मागितल्या. आदीकमासात चांदीचे ताट मागितले.लोक ज्याच्यात्याच्या ऐपतीप्रमाने ताट देत असतात,कोणी स्टीलचे ताट देतात, कोणी तांब्याचं ताम्हण देतात, पण त्यांनी माझ्याकडे चांदीच्या ताटाची मागणी केली होती. तीही मी पूर्ण केली. या सगळ्याचा थोड्या दिवसांतच उलगडा होऊल असंही अनिल कस्पटेंनी सांगितलं .