
PM Modi Statue of Unity program of sardar Vallabhbhai Patel Jayanti Tribute to Indira Gandhi on 41st Death Anniversary
Indira Gandhi: नवी दिल्ली : भारतामध्ये महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते. आणि पुण्यतिथीला देखील शोक व्यक्त केला जातो. आज (दि.31 ऑक्टोबर) असेच दोन विरुद्ध चित्र दिसून येत आहे. एकीकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी इंदिरा गांधी यांची तब्बल 25 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानिमित्ताने कॉंग्रेस पक्षाकडून शोक व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपकडून गुजरामध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने गुजरातमधील स्टैच्यू ऑफ यूनिटी येथे दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे. त्यामुळे देशामध्ये एकीकडे शोक तर दुसरीकडे आनंद दिसून येत आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे आजच्या दिवशी त्यांच्या शीख अंगरक्षकांनी त्यांना केवळ पाच फुटांच्या अंतरावरुन 25 गोळ्या झाडून हत्या केली. यामुळे कॉंग्रेसकडून आज शोक व्यक्त केला जात आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची हत्या करण्यात आली होती. या ठिकाणी आता इंदिरा गांधी स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. तसेच त्या शेवटच्या चालत आलेल्या मार्ग देखील सुरक्षित ठेवण्यात आला आहे. कॉंग्रेस नेत्यांनी या ठिकाणी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला.
श्रद्धांजलि 🙏 📍 इंदिरा गांधी मेमोरियल, नई दिल्ली pic.twitter.com/0yD7Yzs1kj — Congress (@INCIndia) October 31, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी खास भावना व्यक्त केल्या आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत भावना व्यक्त केल्या. राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, “भारत की इंदिरा…! निर्भय, दृढनिश्चयी आणि प्रत्येक शक्तीसमोर अढळ. आजी, तू मला शिकवलेस की भारताची ओळख आणि स्वाभिमानापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. तुझे धाडस, करुणा आणि देशभक्ती माझ्या प्रत्येक पावलाला प्रेरणा देत राहते,” अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर कॉंग्रेस पक्षामध्ये आज एकूणच शोकमय वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
तर दुसरीकडे मात्र भाजपमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त National Unity Dayसाजरा केला जात आहे. यानिमित्ताने गुजरामध्ये असणाऱ्या केवड़ियामधील स्टैच्यू ऑफ यूनिटी या भव्य पुतळ्याच्या परिसरामध्ये दिमाखदार अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत.
Millions of Indians will forever find inspiration in the life of the ‘Iron Lady of India’, Smt. Indira Gandhi, a symbol of resilience, courage, and visionary leadership. Her resolute commitment to India’s progress and unity remains in our hearts and minds. She laid down her life… pic.twitter.com/aPFbSJQLiO — Mallikarjun Kharge (@kharge) October 31, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्वातंत्र्यानंतर ५६० हून अधिक संस्थानांचे एकत्रीकरण करणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारताने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सांस्कृतिक उत्सवामध्ये सहभाग घेतला, १,२१९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे अनावरण केले आणि परेड दरम्यान एकतेची शपथ घेतली, त्याचबरोबर पोलीस आणि अर्धसैनिक बलोंची तर राष्ट्रीय एकता दिवस परेड देखील झाली.सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) आणि केंद्रीय रिजर्व पोलीस बल (एसआरपीएफ) जसे अर्धसैनिक बल आणि विविध राज्य पोलिस दलांनीयामध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्साह दिसून आला.
Attended a remarkable Ekta Parade in Kevadia! This Parade, being held on the 150th Jayanti of Sardar Patel, showcased India’s rich cultural diversity. pic.twitter.com/jQU1hEUndD — Narendra Modi (@narendramodi) October 31, 2025
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आम्हाला अभिमान आहे की आम्ही देशाचे विभाजन करणारी राजकीय अस्पृश्यता संपवली आहे. आम्ही सरदार पटेलांसाठी स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधली. काँग्रेसच्या काळात बाबा साहेबांचे घर, दिल्लीतील महापरिनिर्वाण स्थळ, भयानक दुर्दैवाने ग्रस्त झाले. कॉंग्रेसकडून देशात राजकीय अस्पृश्यतेला एक संस्कृती बनवण्यात आली. काँग्रेस सरकारच्या काळात सरदार पटेल आणि त्यांच्या वारशाचे काय झाले? या लोकांनी बाबा साहेबांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूनंतरही काय केले? नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे काय केले गेले? डॉ. लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्यासोबतही असेच केले गेले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमामध्ये केला.