PM Narendra Modi Gujarat vadodara Tiranga Samman Yatra Qureshi family showered flowers
वडोदरा : पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने लष्करी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र आता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी लागू आहे. दरम्यान, सत्ताधारी नेत्यांकडून देशभरामध्ये तिरंगा रॅली काढली जात आहे. त्याचबरोबर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये ‘सिंदूर सन्मान यात्रा’ काढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील वडोदरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमानतळापासून हवाई दलाच्या गेटपर्यंत एक किलोमीटरचा रोड शो केला. या रोड शोला सिंदूर सन्मान यात्रा असे नाव देण्यात आले. रोड शो दरम्यान कर्नल सोफिया यांचे कुटुंबही उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या या रोड शोची सर्वात खास गोष्ट म्हणजे यावेळी कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबही उपस्थित होते. एवढेच नाही तर सोफियाच्या कुटुंबाने पंतप्रधान मोदींवर फुलांचा वर्षावही केला. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. कर्नल सोफिया हिच्या कुटुंबियांनी पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी केल्याने सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत.
#WATCH | Gujarat: Family members of Indian Army officer Colonel Sofiya Qureshi, shower flower petals as Prime Minister Narendra Modi holds a roadshow in Vadodara, Gujarat
During his 2-day visit to Gujarat, PM Modi will inaugurate and lay the foundation stones for various… pic.twitter.com/s1aYwPdgWO
— ANI (@ANI) May 26, 2025
या रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दाहोदला पोहोचतील आणि जाहीर सभेला संबोधित करतील. मोदी आज गुजरातमध्ये ३ रोड शो आणि तीन कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. वडोदरा नंतर, पंतप्रधान दाहोद येथे एका जाहीर सभेला संबोधित करतील. या काळात ते अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन करतील.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर दुपारच्या सुमारास, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूज आणि अहमदाबादमध्ये रोड शो करतील. तसेच सोमवारी (दि.26) रात्री ते राजभवनात राहतील. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ मे रोजी मोदी गांधीनगरमधील महात्मा मंदिर नगरविकास मंत्रालयाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर ते अहमदाबादहून दिल्लीला रवाना होतील. पंतप्रधान दोन दिवसांत गुजरातमध्ये ७७,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचा शुभारंभ करतील.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली होती. यानंतर, पंतप्रधान मोदी गुजरातमधील भूज येथे पाकिस्तान सीमेजवळ उभे राहून एक कडक संदेश देणार आहेत. त्यामुळे, कच्छ, बनासकांठा आणि पाटण सारख्या सीमावर्ती जिल्ह्यांसाठी ही भेट अधिक खास आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी, पंतप्रधान मोदी १३ मे रोजी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले होते. त्यांनी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी २८ मिनिटे सैनिकांना संबोधित केले. यानंतर, पंतप्रधान मोदींनी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर येथे एक सभा घेतली. येथे त्यांनी म्हटले होते की, दहशतवाद्यांनी आमच्या बहिणींचा धर्म विचारून त्यांचे सिंदूर उडवले. त्याच सिंदूरचे गनपावडरमध्ये रूपांतर झाले आणि दहशतवाद्यांचा नाश झाला.