नवी दिल्ली: आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. गेले दोन दिवस भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईची म्हणजेच ऑपरेशन सिंदूरबद्दल चर्चा सुरु होती. दरम्यान आज राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर वरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ते , जाणून घेऊयात.
संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. “हे सत्र भारताच्या गौरवाचे सत्र आहे. दशतवाद्यांचा गड उध्वस्त करण्याचा हा विजयोत्सव आहे. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी सैन्याला पूर्ण मोकळीक दिली. हा विजयोत्सव भारताच्या सैन्य दलांच्या वीरतेचा आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार याची पाकिस्तानला कल्पना होती.”
पुढे बोलताना पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी आज सभागृहात भारताच्या बाजूने बोलायला उभा आहे. ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यानंमी आरसा दाखवण्यासाठी उभा आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या सामर्थ्याचे जगाला दिसले. ऑपरेशन सिंदूरम्हणजे १४० कोटी भारतीयांच्या इच्छाशक्तीचा विजय आहे. आता भारत बदला घेणार हे पाकिस्तानला कळले आहे. २२ मिनिटांत २२ एप्रिलच्या हल्ल्याचा बदला घेतला.पाकिस्तानची अणू हल्ल्याची धमकी आम्ही खोटी ठरवून दाखवली.”
“भारतीय सैन्याच्या कारवाईची व्याप्ती जगाने पाहिली आहे. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडणारच. मी सार्वजनिकपणे सांगितले होते, की दहशतवाद्यांना शिक्षा होणारच. त्यांच्या प्रमुखांना देखील कल्पनेपेक्षा भयानक शिक्षा मिळणार असे मी सांगितले होते. कोणत्याही देशाने भारताला कारवाई करण्यापासून रोखले नव्हते.
“ऑपरेशन सिंदूर करणाऱ्या भारतीय सैन्याला काँग्रेसचे समर्थन मिळाले नाही. लष्कराला कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. केवळ राजकारणासाठी काँग्रेसकडून ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसच्या बालिशपणामुळे सैन्याच्या मनोबलावर परिणाम झाला. काँग्रेसचा प्रपोगंडा म्हणजे सीमेपलिकडचा प्रपोगंडा. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि जगाने आत्मनिर्भर भारर्ताची ताकद पाहिली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आम्ही ठरवलेले टार्गेट १०० टक्के पूर्ण केले. १० आणि ११ मे रोजी कायम लक्षात राहील असा धडा पाकिस्तानला शिकवलं आहे. आम्हाला जगाचा पाठिंबा मिळाला, मात्र काँग्रेसचा नाही. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान गुडघ्यावर आला. आता हल्ले थांबवा अशी याचना पाकिस्तान करत होता. भारताच्या हल्ल्यानंतर पक्षितांनी डीजीएमओचा फोन आला होता.