पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर
हिंसाचारानंतर पहिल्यांदाच दिली भेट
जनतेला केले संबोधित
Manipur News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर राज्याच्या दौऱ्यावर होते. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभराने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी 8,500 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले आहे. तसेच चुराचांदपुर येथील सभेला मोदींनी संबोधित केले आहे. तसेच त्यांनी यावेळी शांततेचे आवाहन देखील केले आहे.
मणिपूर दौऱ्यावर असताना चुराचांदपुर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. जनतेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मणिपूरची जनता आता विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. हा प्रदेश लोकांसाठी आता उदाहरण बनत आहे. मणिपूरमधील प्रत्येक नागरिकाचा विकास व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मणिपूरचे नाव ‘मणी’ आहे जे या भागाची ओळख बनेल.”
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “हिंसाचाराने मणिपूर प्रभावित झाले. मात्र आता येथील नागरिक शांततेच्या मार्गाने पुढे जात आहेत. सर्व संघटना आणि गटांना सामाजिक सद्भावनेने पुढे जाण्याचे आवाहन करतो. भारत सरकार आणि मणिपूर सरकार विस्थापित झालेल्या लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे.”
Manipur is a vital pillar of India's progress. Addressing a programme during the launch of development initiatives in Churachandpur. https://t.co/1JENvDXOoE
— Narendra Modi (@narendramodi) September 13, 2025
“मी आता छावणीत राहत असलेल्या नागरिकांची भेट देखील घेतली. मणिपूरसारख्या सुंदर राज्याला हिंसेचा दंश झाला. माझे तुम्हाला वचन आहे, मी आणि भारत सरकार तुमच्यासोबत आहे. मणिपूरच्या विकासासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. 7000 बेघर नागरिकांना घर देण्यासाठी सर्व मदत करू, असे” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.