Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केजरीवालांच्या ‘शीशमहल’वर ३३ कोटींचा खर्च; PM नरेंद्र मोदींची सडकून टीका

दिल्ली निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कॅगचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर राजधानी दिल्लीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. केजरीवाल यांच्या निवास्थानाच्या नुतनीकरणाचा खर्च तब्बल ३३.६६ कोटींवर गेल्याचं म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 05, 2025 | 07:34 PM
केजरीवालांच्या 'शीशमहल'वर ३३ कोटींचा खर्च; PM नरेंद्र मोदींची सडकून टीका

केजरीवालांच्या 'शीशमहल'वर ३३ कोटींचा खर्च; PM नरेंद्र मोदींची सडकून टीका

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी कॅगचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर राजधानी दिल्लीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. या अहवालात आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणावर झालेल्या खर्चाचा तपशील दिला आहे. नुतनीकरणाचा खर्च तब्बल ३३.६६ कोटींवर गेल्याचं या अहवालात म्हटलं असून त्यावरून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केजरीवाल यांच्यावर घणाघाती टीका केली.

दिल्लीत भाजपाच्या परिवर्तन मेळाव्यात बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज एका मोठ्या वृत्तपत्रात अरविंद केजरीवाल यांच्या शीश महलवर झालेल्या खर्चाचा तपशील देण्यात आला आहे. कॅगच्या अहवालात नमूद केलेल्या आकडेवारीवर ही बातमी आहे. करोना महामारीच्या काळात जेव्हा संपूर्ण देश झगडत होता. तेव्हा आम आदमी पक्ष शीश महाल बांधण्यात व्यस्त होता.

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच ‘कॅग’च्या अहवालावर आधारित द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीत अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणावर झालेल्या खर्चाचा तपशील दिला आहे. नुतनीकरणासाठी सुरुवातीला ७.९१ कोटींचा खर्चाचा प्रस्ताव दिला गेला. मात्र नंतर हा खर्च वाढून २०२० मध्ये तब्बल ८.६२ कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र २०२२ रोजी जेव्हा नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले तेव्हा त्याची एकूण किंमत ३३.६६ कोटींवर गेली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “दिल्लीवर ‘आप’दा आणणारे हे लोक केंद्रावर खोटा आरोप करतात की, केंद्र सरकार आम्हाला काम करू देत नाही. केंद्र सरकार पैसे देत नाही. पण हे लोक किती खोटारडे आहेत, याचे उदाहरण यांचा शीश महाल पाहून कळते. आजच एका मोठ्या वृत्तपत्राने शीश महालावर झालेल्या खर्चाचा तपशील दिला आहे. करोना काळात दिल्लीतील लोक औषध आणि ऑक्सिजनासाठी झगडत होते, तेव्हा हे लोक आपला शीश महाल बनविण्यात दंग होते.”

कॅगच्या अहवालात नेमकं काय?
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानाचे दरवाजे आणि खिडक्यांना पडदे लावण्यासाठी तब्बल ९६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर किचनमधील उपकरणांसाठी ३९ लाख रुपये खर्च करण्यात आले.
टीव्ही कन्सोलसाठी २० लाख ३४ हजार रुपये आणि जिम उपकरणासाठी १८ लाख ५२ हजार रुपये तर कार्पेट बसविण्यासाठी २० लाख ३४ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.
याशिवाय मिनी बारसाठी ४ लाख ८० हजार रुपये. भिंतींवर मार्बल बसविण्यासाठी २० लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु, अंतिम खर्च ६६ लाख ८९ हजार रुपयांवर गेला.
मजल्यावर टाइल बसविण्यासाठी ५ लाख ५० हजार रुपये प्रस्तावित होते. परंतु, हा खर्च जवळपास १४ लाखांपर्यंत गेला आहे.
नूतनीकरणाच्या दरम्यान, बांधकाम क्षेत्र ३६ टक्के (१,३९७ चौ. मी. पासून १,९०५ चौ. मी. पर्यंत) वाढले आहे. या सर्व गोष्टी नूतनीकरण खर्च वाढण्यास कारणीभूत ठरल्या आहेत.

Web Title: Pm narendra modi slams aap over money spent on sheesh mahal arvind kejariwal government residence cag report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 07:21 PM

Topics:  

  • Aam Aadami Party
  • Arvind kejriwal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
1

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
2

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
3

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…
4

Tariff War: PM मोदींना आला पुतीनचा फोन; ट्रम्पशी काय झाले बोलणं? एक-एक गोष्ट अशी सांगितली की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.