Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar News: बिहारमध्ये जागावाटपावरून राजकारण तापलं; काँग्रेसची ६६ जागांची मागणी, तर NDA…

महाआघाडीत विविध पक्षांनी केलेल्या जागांच्या दाव्यांमुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. वीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांनी ५० जागा आणि उपमुख्यमंत्री पदाची मागणी करून चर्चेला नवा वळण दिला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 08, 2025 | 04:45 PM
Bihar News: बिहारमध्ये जागावाटपावरून राजकारण तापलं; काँग्रेसची ६६ जागांची मागणी, तर NDA…
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहारमध्ये  काँग्रेसकडून 50 जागांची मागणी
  • मुकेश साहनींकडून  ५० जागा आणि उपमुख्यमंत्रीपदाची मागणी
  • जेडीयची स्वत:१२२ ते १२४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी

Bihar Assembly Elections 2025: बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय  वातावरण चांगलेच तापले आहे.  दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडी – जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरू आहेत.  दोन्हीकडील नेते “सर्व काही सुरळीत” असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात दोन्ही बाजूंमध्ये जागावाटपावरून गंभीर मतभेद समोर येऊ लागले आहेत.

महाआघाडीत साहनींच्या मागण्यांमुळे पेच

महाआघाडीत विविध पक्षांनी केलेल्या जागांच्या दाव्यांमुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. वीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांनी ५० जागा आणि उपमुख्यमंत्री पदाची मागणी करून चर्चेला नवा वळण दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आघाडीत तणाव वाढला आहे.

मराठा आरक्षणाचा मार्ग नाही सोपा; नव्या GR विरोधात ओबीसी नेते छगन भुजबळ जाणार कोर्टात

तर काँग्रेसने ६६ जागांचा दावा करताना ५० जागांची यादी राजदकडे सुपूर्द केली आहे. डाव्या पक्षांनी ३०-४० जागांवर दावा केला आहे, तर झारखंड मुक्ति मोर्चा (झामुमो) १२ जागा मागत आहे. दुसरीकडे, पशुपती पारस यांच्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीने २० जागांवर दावा केला आहे. आरजेडी स्वतःच किमान १२२ ते १२४ जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

कोण किती जागांवर लढणार? (महाआघाडी)

पक्ष संभाव्य जागा

काँग्रेस ५५
डावे पक्ष ३०
वीआयपी (साहनी) ३० (त्यापैकी १५ जागांवर काँग्रेस/आरजेडीचे उमेदवार)
झामुमो ५ ते ६
पशुपती पारस गट चर्चेत, अट साहनींसारखीच

दरम्यान मागील निवडणुकीत काँग्रेसने ८० जागांवर उमेदवार उभे केले होते आणि १९ जागा जिंकल्या होत्या.

NDAमध्ये चिराग-मांझी यांच्यामुळे गोंधळ

एनडीएमध्ये देखील अंतर्गत संघर्ष वाढताना दिसत आहे. चिराग पासवान (एलजेपी-रामविलास) यांनी ४० ते ५० जागांवर दावा केला आहे, तर एचएएमचे प्रमुख जीतन राम मांझी यांनाही जवळपास तितक्याच जागा हव्या आहेत. जर त्यांना अपेक्षित जागा न मिळाल्या, तर ते स्वबळावर निवडणूक लढवतील. असा इशाराही त्यांनी दिला आहे.  यामुळे एनडीएसाठी जागावाटपाचे गणित अधिकच क्लिष्ट बनले आहे.

Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर

सध्याची परिस्थिती: तडजोडीचा टप्पा

दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असली तरी अंतर्गत गटबाजी, पदांच्या अपेक्षा आणि प्रादेशिक पक्षांची वाढती ताकद यामुळे जागा वाटपात तडजोडीचा ताण जाणवतो आहे. पुढील काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे, परंतु अंतिम युतीचे स्वरूप कसे असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दबावाचे राजकारण

जीतन राम मांझी यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सर्व २४३ जागांसाठी तयारी करण्याचे निर्देश दिले. तर दुसरीकडे, चिराग पासवान यांचे मेहुणे अरुण भारती यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून २०२० च्या विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रीया देत आगामी निवडणुकीसाठीही आम्ही सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, उपेंद्र कुशवाह यांनी दोन दिवसांपूर्वी पाटण्यातील मिलर स्कूल येथे रॅली काढून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, जेडीयू १०२ जागांवर आणि भाजप १०१ जागांवर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत मांझी आणि चिराग पासवान यांच्या दाव्यांमुळे एनडीएमध्येच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Web Title: Politics heats up in bihar over seat sharing congress demands 66 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Bihar Assembly Elections
  • Nitish Kumar

संबंधित बातम्या

Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी घोषणा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यक…
1

Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मोठी घोषणा, अंगणवाडी सेविका आणि सहाय्यक…

Bihar Politics: 16 दिवस एकत्र, तेजस्वी यादवची ओंजळ रिकामीच; राहुल गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे महाआघाडीत पडणार फूट
2

Bihar Politics: 16 दिवस एकत्र, तेजस्वी यादवची ओंजळ रिकामीच; राहुल गांधींच्या ‘या’ निर्णयामुळे महाआघाडीत पडणार फूट

Rahul Gandhi Patna Live: ‘मतचोरी म्हणजे तरुण पिढीच्या भविष्याची चोरी…’; पटनातून राहुल गांधींचा हल्लाबोल
3

Rahul Gandhi Patna Live: ‘मतचोरी म्हणजे तरुण पिढीच्या भविष्याची चोरी…’; पटनातून राहुल गांधींचा हल्लाबोल

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा
4

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.