Eknath Shinde News: फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्हाला भाजपने बाजूला केलयं का? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
Eknath Shinde on BJP and Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षांपूर्वी जून २०२२ मध्ये एक मोठा भुकंप झाला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडत शिवसेनेतून फारकत घेतली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगानेही त्यांच्या वेगळ्या गटाला शिवसेना असल्याचे शिक्कामोर्तब केले. एकनाथ शिंदेंनी फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ४० आमदारांसोबत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.पुढील अडीच वर्षे त्यांनी राज्याचं नेतृत्त्व केलं.
Prashant Kishor News: ..तर राजकारण सोडून देईन; बिहारच्या निवडणुकांबाबत प्रशांत किशोरांचा खळबळजनक
अडीच वर्ष राज्यात सत्तेत राहिल्यानंत २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३८ जागा जिंकत राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. पण यावेळी मात्री भाजपने मुख्यमंत्री पदाची सुत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हाती सोपवली. तर,एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची सुत्रे देण्यात आली. विधानसभेतील विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेकदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पण १३२ जागा जिंकल्यामुळे भाजपने मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना भाजपकडून खरा पाठिंबा मिळाला. पण गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यापासून त्यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्यास सुरूवात केल्याची चर्चा आहे.
यावरून अनेकदा राजकीय वर्तुळातील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात वादाच्या ठिणग्या पडल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकारावर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
“फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपाने तुम्हाला बाजूला केलं आहे का?” या प्रश्नावर उत्तर देतना एकनाथ शिंदे म्हणाले, “मला असं वाटत नाही की भाजपाने मला बाजूला केलं आहे, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार – हे दोन्ही उपमुख्यमंत्री – आणि मी, आम्ही तिघं एकत्र एक टीम म्हणून काम करत होतो. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही दोघं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहोत. त्यामुळे आमचं टीमवर्क तसंच सुरु आहे.”
“विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आमचं कोणतंही वैयक्तिक स्वार्थाचं राजकारण नाही. आम्हाला महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेत विकसित भारताच्या दिशेने काम करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचं स्वप्न पाहिलं आहे, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या विकासयात्रेसाठी आम्ही तीन टप्पे निश्चित केले आहेत – २०२९, २०३५ आणि २०४७. या प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी आमचं नियोजन आणि अंमलबजावणी सुरु आहे,” असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.