Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट मुद्द्याला घातला हात, विचारलं ‘ऑनलाइन अभ्यास करता की रिल्स पाहता ?’

युग बदलतं तसं माध्यमही बदलतं. पूर्वीच्या काळी गुरुकुल असायचे, तेव्हा पुस्तके नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळी फक्त ऐकायचे आणि पाठांतर करायचे. अनेक पिढ्या हे असंच चालू होतं. पुढे पुस्तकं आली, ही उत्क्रांती होतच गेली.आज आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणखी पुढे आलोय, आणखी सोपं झालं आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) कार्यक्रमात केलं आहे.

  • By साधना
Updated On: Apr 01, 2022 | 12:53 PM
narendra modi in pariksha pe charcha

narendra modi in pariksha pe charcha

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आपल्या परीक्षा पे चर्चा (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमातून देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी ते शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं देत आहेत. यावेळी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांसोबत (Student) थट्टामस्करीही केल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही ऑनलाईन अभ्यास (Online Study) करता की रिल्स पाहता असा मिश्कील प्रश्नही त्यांनी विद्यार्थ्यांना विचारला आहे.

#ParikshaPeCharcha with my young friends. https://t.co/VYwDO6PLLz — Narendra Modi (@narendramodi) April 1, 2022

ऑनलाईन अभ्यास करताना लक्ष विचलित होतं, अशी तक्रार काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केली असता, त्यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर दिलं. ते म्हणाले,“माझ्या मनात एक गोष्ट येतेय की, तुम्ही विचार करा की, तुम्ही ऑनलाईन वाचत असता की रिल्स पाहत असता ? मी तुम्हाला हात वर करायला लावणार नाही. पण तुम्हाला कळलं की मी तुम्हाला पकडलं आहे. खरंतर दोष ऑनलाईन किंवा ऑफलाईनचा नाही. तुम्ही अनुभव घेतला असेल वर्गातही अनेकदा तुमचं शरीर वर्गात आहे, डोळे शिक्षकांकडे आहेत पण एकही गोष्ट कानात जात नसेल. कारण तुमचं मन कुठेतरी दुसरीकडे आहे. ज्या गोष्टी ऑफलाईन होतात, त्याच गोष्टी ऑनलाईन होतात. याचा अर्थ माध्यम ही समस्या नसून मन ही समस्या आहे. माध्यम कोणतंही असून माझं मन जर त्याच्याशी जोडलेलं आहे, त्यात मग्न आहे, तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन काहीही फरक पडतो.

[read_also content=”देशात पहिल्यांदाच मिळाला बलात्काराच्या प्रकरणात डीएनए चाचणीतून मतिमंद पीडित महिलेला न्याय, दरमहा पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश https://www.navarashtra.com/maharashtra/for-the-first-time-in-the-history-of-the-country-a-woman-suffering-from-mental-retardation-was-brought-to-justice-through-dna-test-nraa-262726/”]

मोदी पुढे म्हणाले, “युग बदलतं तसं माध्यमही बदलतं. पूर्वीच्या काळी गुरुकुल असायचे, तेव्हा पुस्तके नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळी फक्त ऐकायचे आणि पाठांतर करायचे. अनेक पिढ्या हे असंच चालू होतं. पुढे पुस्तकं आली, ही उत्क्रांती होतच गेली.आज आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणखी पुढे आलोय, आणखी सोपं झालं आहे. याला आपण एक समस्या न समजता एक संधी समजलं पाहिजे. पण हेही खरं आहे की आपण प्रयत्न करायला हवा की ऑनलाईन अभ्यासाला तुम्ही बक्षीस म्हणून समजायला हवं. तुम्ही जर शिक्षकांनी दिलेल्या नोट्स आणि ऑनलाईन मिळालेल्या नोट्स या दोन्ही वाचल्या तर तुम्ही तुमच्या अभ्यासात आणखी भर घालू शकाल. दोन्ही एकत्र करून अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होईल. शिक्षणाचा एक भाग आहे ज्ञानार्जन करणे. ऑनलाईन मिळवण्यासाठी आहे आणि ऑफलाईन घडण्यासाठी आहे. मला किती ज्ञान मिळवायचं आहे, ते मी जगातल्या कानाकोपऱ्यातून मिळवेन आणि जे मला तिथे मिळालं आहे ते मी ऑफलाईन स्वतःला घडवण्यासाठी वापरेन”.

यावेळी पंतप्रधानांनी एक उदाहरणही दिलं. ते म्हणाले, “तुम्ही ऑनलाईन डोसा तयार कराल, मस्त डोसा तयार कराल पण त्याने पोट भरेल का? पण हेच जर डोसा कसा बनवायचा हे ऑनलाईन पाहिलं आणि प्रत्यक्षात डोसा बनवला तर त्याने पोट भरेल. ज्ञानाचंही असंच आहे. ऑनलाईनचा आधार घेऊन तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे आणि ते ज्ञान तुमच्या जीवनात वापरायचं आहे. पूर्वी ज्ञान मिळवण्याची अगदी मर्यादित साधनं होती, पण आता त्या मर्यादा राहिलेली नाही. त्यामुळे तुम्ही ऑनलाईनला एक संधी समजा, तुम्हाला टूल्सही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही स्वतःला शिस्त लावू शकता. अनेक मुलं या टूल्सच्या माध्यमातून स्वतःवर काही बंधनं घालून घेतात, ज्यांचा त्यांना फायदा होता.”

Web Title: Prime minister narendra modis question to students in pariksha pe charcha do you watch reels online or study nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2022 | 12:50 PM

Topics:  

  • Pariksha Pe Charcha
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Seven Budgets, One Vision: मोदींच्या आर्थिक टीमचा सर्वात विश्वासार्ह चेहरा;अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर मोदींचा अढळ विश्वास का?
1

Seven Budgets, One Vision: मोदींच्या आर्थिक टीमचा सर्वात विश्वासार्ह चेहरा;अर्थमंत्री सीतारमण यांच्यावर मोदींचा अढळ विश्वास का?

पुण्यात बँक कर्मचारी आक्रमक, जोरदार निदर्शने; नेमकं मागण्या काय?
2

पुण्यात बँक कर्मचारी आक्रमक, जोरदार निदर्शने; नेमकं मागण्या काय?

PM Modi on India-EU trade: भारत–EU चा FTA ऐतिहासिक करार! भारताचे पंतप्रधान मोदी म्हणाले,’हा केवळ व्यापार.. 
3

PM Modi on India-EU trade: भारत–EU चा FTA ऐतिहासिक करार! भारताचे पंतप्रधान मोदी म्हणाले,’हा केवळ व्यापार.. 

Republic Day 2026: प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर अमेरिकन ‘अपाचे’चा थरार; ट्रम्प म्हणाले, ‘आमचे भारताशी ऐतिहासिक बंध’
4

Republic Day 2026: प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर अमेरिकन ‘अपाचे’चा थरार; ट्रम्प म्हणाले, ‘आमचे भारताशी ऐतिहासिक बंध’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.