
हिंजवडी आणि परिसर हा देशातील महत्त्वाचा आयटी हब
हिंजवडी आणि परिसर हा देशातील महत्त्वाचा आयटी हब आहे. या परिसरात दररोज हजारो कर्मचारी कामासाठी येतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना अनेकदा एक ते दोन तास अडकून पडावे लागते. मेट्रो सुरू झाल्यामुळे आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विशेषतः तरुण- तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन 2018 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
Pune Metro: अभिमानाची बातमी! देशातील पहिली महिला संचालित मेट्रो पुण्यात; १०० महिला ट्रेन पायलट सज्ज
देशात सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) मेट्रो प्रकल्प उभारण्याच्या धोरणानंतर शिवाजीनगर-हिंजवडी हा पहिला प्रकल्प ठरला. डीबीओटी तत्त्वावर टाटा प्रोजेक्ट्स आणि सीमेन्स यांनी या प्रकल्पाची उभारणी केली. केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य, व्यवहार्यता तफावत निधी आणि महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आलेले जमीन संपादन यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला. या प्रकल्पाच्या उभारणीपासून संचालनापर्यंत महिलांचे योगदान महत्त्वाचे असून ही ‘पिंक पॉवर्ड’ मेट्रो महिला शक्तीच्या सहभागाचे प्रतीक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
पुणे मेट्रो मार्गिका 3 (Pink Line) च्या पहिल्या तिकिटासह विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात! 🚇 @metrorailpune
#Maharashtra #PuneMetro https://t.co/whqOztFb0b — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 3, 2026
पुणे शहरात सुमारे 120 किलोमीटरचे मेट्रो मार्ग तयार झाले असून काही मार्गांची कामे सुरू आहेत. देशातील मेट्रो विस्ताराचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला झाला आहे. राज्यातील 12 महापालिका क्षेत्रांत मेट्रो सुरू आहे किंवा तिचे काम सुरू आहे. मेट्रो ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आर्थिक विकासाला चालना देणारी यंत्रणा आहे. मेट्रोमुळे गुंतवणूक, रोजगार आणि त्याभोवतीचे आर्थिक परिसंस्थेचे जाळे विकसित होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुणे महानगर प्रदेशाला मोठे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून पुणे आणि पीएमआर परिसरात आधुनिक वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे. पुणे मेट्रो ही ग्रीन मेट्रो म्हणून विकसित होत असून आवश्यक ऊर्जेपैकी 30 टक्के ऊर्जा स्वतः निर्माण करणार आहे. पुणे परिसरात मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, इनर व आउटर रिंगरोड, सीएमटीआर, भूमिगत मार्ग आणि बोगद्यांचे जाळे विकसित होत आहे. यामुळे पुणे केवळ आयटी आणि उत्पादन क्षेत्राचेच नव्हे, तर फ्रंटियर टेक्नॉलॉजीचेही महत्त्वाचे केंद्र बनेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात पुण्याचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
देशात पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच गरिबी निर्मूलन आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. विकासाच्या प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिक आणि समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सहकार्य आणि मार्गदर्शन कायम मिळत राहील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
Ans: 2030 पर्यंत पुणे महानगर प्रदेश देशातील महत्त्वाचे मोबिलिटी केंद्र बनेल, असे फडणवीस म्हणाले.
Ans: पुणे महानगर प्रदेशाला मोठे शहरी विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.